Central School मध्ये एक्साम न देताच मिळवा 1 लाख पगाराची नोकरी; जाणून घ्या कुठं करायचा अर्ज

Central School मध्ये एक्साम न देताच मिळवा 1 लाख पगाराची नोकरी; जाणून घ्या कुठं करायचा अर्ज

Kendriya Vidyalaya Parbhani Recruitment : केंद्रीय विद्यालयांमध्ये (Central School) नोकरी (job) करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय परभणी (Kendriya Vidyalaya Parbhani) येथे लवकरच काही रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची नोटिफिकेशिन प्रकाशित करण्यात आले. ही भरती टीजीटी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – (इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्य अनुभव) या पदासाठी आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 30 जून 2023 असेल. (Get 1 lakh salary job without giving exam in Central school parbhani)

कोणत्या पदांसाठी भरती?

केंद्रीय विद्यालय परभणीने प्रकाशित केलेले नोटिफिकेश हे TGT प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या भरतीसाठी आहे. या भरतीअंतर्गत इंग्रजी, हिंदी, सामाजिक अभ्यास, विज्ञान, संस्कृत, गणित, शारीरिक आणि आरोग्य शिक्षण, कला शिक्षण, कार्य अनुभव या विषयांच्या शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

पात्रता काय? –
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता देण्यात आली आहे. पात्रतेबाबत अधिक तपशीलांसाठी मुळ जाहिरात वाचावी.
1. NCERT च्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयाचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम संबंधित विषयात किमान 50% गुणांसह पूर्ण केलेला असावा.

2. संबंधित विषयांमध्ये /विषयांच्या संयोजनात आणि एकूणात किमान 50% गुणांसह बॅचलर पदवी.

3. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएड किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.

4. CBSE द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पेपर-II उत्तीर्ण असावा, या उद्देशासाठी NCTE ने तयार केलेल्या मागर्दर्शक तत्वांनुसार, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात शिकवण्यात प्रवीणता मिळवली असणं आवश्यक आहे.

6. मराठी, हिंदी या विषयांचा तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव असावा.

6. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असावे.

लोकप्रिय युट्यूबर कुशा कपिलाचा घटस्फोट; लग्नानंतर सहाच वर्षात झाले विभक्त 

पगार-

टीजीटी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – रु. 49,000/- रु. 1,42,400/- प्रति महिना

वयोमर्यादा –
उमेदवारांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी.

आवश्यक कागदपत्रे
बायोडेटा, 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला , जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

मुलाखतीचा पत्ता– केंद्रीय विद्यालय परभणी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वसमत रोड, परभणी -431401

मुलाखतीचा तारीख : 30 जून 2023

जाहिरात : https://parbhani.kvs.ac.in/sites/default/files/Qualification%20of%20TGT%20%28S.St%29.pdf

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://parbhani.kvs.ac.in/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube