राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात परिक्षा न देता मिळवा नोकरीची संधी, मासिक पगार तब्बल 1 लाख 77 हजार

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात परिक्षा न देता मिळवा नोकरीची संधी, मासिक पगार तब्बल 1 लाख 77 हजार

चांगले पद आणि पगाराची नोकरी (Goverment Job) शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात (National Informatics Centre) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर (National Informatics Centre Job 2023) करण्यात आले असून त्या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, पगार याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply online) करू शकतात.

राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 598 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये सायंटिस्ट-B पदाच्या 71 जागा, सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर पदाची 196 जागा तर सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदाच्या 331 जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी चार मार्च पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून इच्छुक उमेदवारांना दिनांक 4 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रातने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदभरतीसाठी अर्ज करताना पात्रता धारक उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना जोडणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,100/- – 1,77,500/- इतका पगार दिला जाणार आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. त्यानंतरच अर्ज भरावा. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज भरल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

भरली जाणारे पदे
1. शास्त्रत्र – B
2. वैज्ञानिक अधिकारी/अभियंता
3. वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक

एकूण रिक्त पदे – 598

शैक्षणिक निकष आणि अनुभव
1. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रातील पदांसाठी अर्ज करू करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

2. जाहिरातीतल दिलेल्या पदानुसार पात्रता पूर्ण करणं गरजेचं आहे.

3. पात्रता धारक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विश्वविद्यापयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

4. महत्वाचं म्हणजे, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने घालून दिलेल्या सगळ्या अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण करणं आवश्यक आहे.

राज्यात सूर्यनारायणाचा प्रकोप… काय म्हणतंय हवामान खातं, वाचा

पगार किती?
1. शास्त्रज्ञ- B : 56,100/- – 1,77,500/- रुपये प्रतिमहिना
2. वैज्ञानिक अधिकारी/अभियंता : 44,900/- – 1,42,400/- रुपये प्रतिमहिना
3. वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक : 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे :
1. बायोडेटा
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

● अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2023
●या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : www.nic.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube