गाई-म्हशीपेक्षा शेळीचे दूध आहे अधिक शक्तिशाली

Untitled Design   2023 06 01T141221.493

Goat Milk Benifits : दरवर्षी जूनच्या पहिल्या तारखेला ‘जागतिक दूध दिन’ हा साजरा केला जातो, ज्याचा उद्देश लोकांना दुधाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे हा आहे. दरम्यान आपल्याकडे गाय आणि म्हैस हे प्राणी दुधाचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात. मात्र त्या तुलनेत शेळीचे दूध कमी वापरले जाते. मात्र हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतर प्राण्यांच्या दुधापेक्षा शेळीचे दूध जास्त पौष्टिक आणि ताकद देते.

अधिक पौष्टिकता
दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते ज्यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात, मात्र आपण प्रामुख्याने दुधाचे सेवन हे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने मिळविण्यासाठी करतो. मात्र जे लोक शेळीचे दूध पितात त्यांना हे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात मिळतात.

अनेक आजारांवर प्रभावी
शेळीचे दूध प्यायल्याने अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. यामध्ये आपण पहिले तर डेंग्यू ताप, शारीरिक कमजोरी, संसर्ग, ऑस्टिओपोरोसिस, हात आणि पाय सुन्न होणे आदी गोष्टींवर हे दूध अत्यंत फायद्याचे असते.

निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…

प्रथिने आणि कॅल्शियम
एका संशोधनानुसार 100 मिलीलीटर गाई-म्हशीच्या दुधात 3.28 ग्रॅम प्रथिने आणि 123 मिलीग्राम कॅल्शियम आढळते, तर 100 मिलिलिटर शेळीच्या दुधात 3.33 ग्रॅम प्रथिने आणि 125 मिलीग्राम कॅल्शियम असते.

Yeh Jawaani Hai Deewani 10 Years: ‘या’ कारणासाठी एक्स कपल रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण आले एकत्र

व्हिटॅमिन डी चा मुख्य स्रोत
जरी सूर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डी मिळू शकतो, परंतु हिवाळ्यात किंवा अनेक महिने सूर्य उगवत नसलेल्या देशांमध्ये, हे पोषक तत्व अन्नपदार्थातून मिळवावे लागते. 100 मिली बकरीच्या दुधात 42 आययू व्हिटॅमिन डी उपलब्ध आहे.

Tags

follow us