PM Vishwakarma Yojana आहे तरी काय? काय मिळणार फायदे?

PM Vishwakarma Yojana आहे तरी काय? काय मिळणार फायदे?

Govt.Schemes : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देशाला मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची (PM Vishwakarma Yojana) सुरुवात केली आहे. या योजनेची घोषणा 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती.

‘ऐतिहासिक निर्णयोंका सत्र है…’; PM मोदींच्या सूचक विधानानंतर विशेष अधिवेशनात येणार 8 विधेयके

विश्वकर्मा योजनेंतर्गत (PM Vishwakarma Yojana) सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याद्वारे पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळणार आहे. योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, नाव्ही आणि मोची यांसारखी पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांना फायदा मिळणार आहे.

राजस्थानच्या राजकारणात CM शिंदेंची एन्ट्री; भाजपसाठी आव्हान की काँग्रेसची वाट बिकट होणार?

तीन लाख रुपयांचे कर्ज : या (PM Vishwakarma Yojana)योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज 5 टेक्के दराने दिले जाणार आहे. याशिवाय उत्पादने, कारागीर यांच्या सेवांचा विश्वकर्मा योजनेत समावेश केला जाणार आहे.

या योजनेंतर्गत (PM Vishwakarma Yojana) तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्याला व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे. त्यानंतर व्यवसाय सुरु झाल्यानंतर दुसऱ्या व्यवसायाचे आयोजन आणि विस्तार करणयासाठी सरकार दोन लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.

सरकारने या योजनेत 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागिरांना मदत होणार आहे. या योजनेंतर्गत सुतार, होडी बनवणारे कामगार, सोनार, मातीची भांडी आणि लोहार, कुलूप बनवणारे यांच्यासह विविध वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशाचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे आदींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube