सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भाग भांडवली अंशदान

सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भाग भांडवली अंशदान

Government Schemes : उभारणी खालील प्रतिदिन 1250 मे.टन गाळप क्षमतेच्या सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भाग भांडवली अंशदान (Government share capital contribution to cooperative sugar mills)म्हणून सुधारीत प्रकल्प किंमत (Improved project cost) 45 कोटी विचारात घेऊन व वाढीव शासकीय भाग भांडवल प्रकल्प (Government Equity Project)उभारणीसाठी मंजूर करुन वितरीत करण्यात येते.

योजनेच्या प्रमुख अटी : अटी, शर्तीबाबत परिशिष्ट सोबत जोडले आहे. तसेच शासन निर्णयातही काही अटींचा अंतर्भाव आहे.

काळजी घ्या! पुण्यात कोरोना पेशंट्सचा आकडा वाढला

आवश्यक कागदपत्रे :
सहकारी साखर कारखान्यांनी परिपूर्ण भाग भांडवल मागणीचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे मार्फत व स्वंयस्पष्ट अभिप्रायासह सादर करणे आवश्यक.

लाभाचे स्वरूप असे :
उभारणी खालील प्रतिदिन 1250 मे.टन गाळप क्षमतेच्या सहकारी साखर कारखान्यांना त्यांचे प्रकल्प किंमतीच्या पश्चिम महाराष्ट्रासाठी 1:3 व मराठवाडा विदर्भातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 1:5 या प्रमाणात त्यांनी सभासद भाग भांडवल जमा केल्यानंतर दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा : अ). प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभाग कोल्हापूर / पुणे / अहमदनगर / औरंगाबाद / नांदेड / अमरावती व नागपूर.
ब). साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube