राज्यात H3N2 चं संकट वाढलं, पुण्यासह ‘या’ शहरांमध्ये सर्वाधिक फैलाव

राज्यात H3N2 चं संकट वाढलं, पुण्यासह ‘या’ शहरांमध्ये सर्वाधिक फैलाव

पुणे : राज्यात H3N2 चं संकट वाढतंय. शुक्रवारपर्यंत राज्यात 170 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधीक फैलाव झाला आहे. सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासंबंधी (Corona) कोणतेही लक्षणं जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढतंय. या व्हायरसमुळे देशात तीन मृत्यू झाले आहेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरात H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 170 रुग्ण आढळले होते. मुंबई, पुणे आणि ठाण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती.

पाहूया कोणत्या शहरात या व्हायरसचा सर्वाधिक फैलाव झाला आहे.
पुण्यात 26 रुग्ण आढळून आले आहेत. पाच वर्षाखालील वयोगटात एकही रुग्ण नाही तर 6 ते 18 वयोगटात पाच रुग्ण आढळून आले आहेत. 19 ते 60 वयोगटात 13 रुग्ण आढळून आले आहेत. 60 वर्षाच्या पुढील वयोगटात चार रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात एकूण रुग्णसंख्या 22 वर पोहचली आहे. पुण्याप्रमाणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये H3N2 चे रुग्ण वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 रुग्ण तर नाशिकमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत.

Ramdas Kadam : परब यांनी सदानंद कदमला बळीचा बकरा बनवलयं

H3N2 हा एन्फ्लूएंजाचा प्रकार आहे. जास्त घातक नाही पण कोरोनाच्या बाबतीत आपण पाहिले की ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे. त्यांना गंभीर त्रास होण्याची शक्यता आहे. यामध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशा लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. एन्फ्लूएंजाचा उपप्रकार असलेल्या H3N2 व्हायरसने राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 2020 मध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा धुमाकूळ घातला होता. आताही H3N2 चा फैलाव सुरु झाला आहे. कोरोनासारखा रुग्ण वाढीचा या व्हायरसचा वेग नाही पण तरीही पुरेसी काळजी घेण्याची गरज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube