Ramdas Kadam : परब यांनी सदानंद कदमला बळीचा बकरा बनवलयं

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 14T185317.178

Ramdas Kadam : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी ईडीने माजी SDO जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने ही दुसरी अटक केली आहे. याआधी ईडीने सदानंद कदम यांना या साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. ते 15 मार्च पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणार आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत. या सर्व प्रकरणावर रामदास कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पेटलेलं पाणी ‘असं’ होईल शांत; फडणवीसांनी विधिमंडळात सांगितला मेगा प्रोजेक्ट, वाचा..

सदानंद कदम यांच्या अटकेमागे रामदास कदमचा हात, पाय डोके काहीच नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की, रामदास कदम हा समोरुन वार करणारा आहे. रामदास कदमने कधीही पाठीमागून वार केला नाही. जर माझे म्हणणे ईडीने ऐकले असते तर मी अनिल परबला अटक करायला लावली असती, असे कदम म्हणाले आहेत.

Anantrao Deshmukh : फडणवीसांना हवाहवासा वाटणारा नेता भाजपात!

अनिल परब यांनी माझ्या मुलाला खुप त्रास दिला आहे. माझ्या मुलाला उध्वस्त करण्याचा विडा त्यांनी उचलला होता. परबच्या खांद्यार बंदूक ठेवून उद्धव ठाकरे चाप ओढत होते, असा घणाघात कदम यांनी केला आहे.  अनिल परब यांनी सदानंद कदम यांंना फसवले आहे. ते वकील असल्याने त्यांनी सगळी कागदपत्रे सदानंद कदम याच्या नावावर केली आहे. सदानंद कदम यांना बळीच बकरा बनवण्याचे काम परबने केले आहे, अशी टीका कदम यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube