Gas and bloating: ॲसिडिटीवर घरगुती रामबाण उपाय, 5 मिनिटांत आराम

Gas and bloating: ॲसिडिटीवर घरगुती रामबाण उपाय, 5 मिनिटांत आराम

Gas and bloating: असे म्हणतात की माणसाच्या प्रेमात पडण्याचा मार्ग पोटातून जातो. म्हणजेच जर तुम्हाला कोणाचे मन प्रसन्न करायचे असेल तर त्याला चविष्ट पदार्थ द्या. हेच कारण आहे की अनेकदा आपण जेव्हा एखादा पदार्थ चाखतो तेव्हा त्याच्या प्रमाणाकडे लक्ष देत नाही आणि गरजेपेक्षा जास्त अन्न खातो, त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. गॅस्ट्रिक ग्रंथी जास्त प्रमाणात ॲसिड तयार करतात तेव्हा ॲसिडिटीची समस्या उद्भवते. त्यामुळे गॅस, श्वासाची दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवू लागतात.

आपल्या शरीरात गॅस दोन प्रकारे तयार होतो. कॅनेडियन सोसायटी ऑफ इंटेस्टाइनल रिसर्चच्या मते, जेवताना हवा शरीरात प्रवेश करते तेव्हा गॅस तयार होतो. यामुळे शरीरात नायट्रोजन आणि ऑक्सिजन येतो. दुसरीकडे, जेव्हा आपले पोट अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा गॅस तयार होतो, त्यानंतर शरीरात हायड्रोजन, मिथेन किंवा कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार होतात.

या गॅसबाबत वेळीच काही केले नाही तर अनेक समस्या निर्माण होतात. गॅसशी संबंधित या समस्यांपासून लोकांना सहज आराम मिळू शकतो. म्हणूनच खालील काही उपायांचा अवलंब करु शकतो.

ताकाचा आहारत समावेश करा
ताक हे सात्विक अन्नाच्या श्रेणीत गणले जाते. यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते ज्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रिक ॲसिडिटीपासून आराम मिळतो. पुढच्या वेळी गॅसची समस्या जाणवल्यास लगेच एक ग्लास ताक त्यात थोडी काळी मिरी आणि कोथिंबिरीचा रस मिसळून प्या. यामुळे तुम्हाला गॅसपासून लवकर आराम मिळेल.

गॅस तयार झाल्यावर केळीचे सेवन करा
ॲसिडिटी किंवा गॅसपासून आराम मिळवण्यासाठी केळीचा वापर शतकानुशतके केला जात आहे. केळीमध्‍ये नैसर्गिक अँटासिड असतात जे तुम्‍हाला ॲसिड रिफ्लक्स टाळण्‍यात मदत करतात. गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रोज एक केळी खाऊ शकता.

Weight Loss : अतिरिक्त चरबीचं टेन्शन येतंय? वजन कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

सफरचंद सायडर व्हिनेगर
अनेक वेळा शरीरातील ॲसिड रिफ्लक्सचे कारण पोटात ॲसिडची कमतरता असते. आपण सफरचंद व्हिनेगर वापरू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त एक कप पाण्यात दोन चमचे अनफिल्टर्ड ॲपल सायडर व्हिनेगर वापरावे लागेल. याचे दोनदा सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.

जेवणात लवंग वापरा
लवंगाच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तसेच त्याचा carminative प्रभाव आहे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये गॅस रोखण्यासाठी प्रत्यक्षात कार्य करते. जर तुम्ही राजमा किंवा काळे हरभरे बनवत असाल तर ते बनवताना लवंग नक्की वापरा.

Priya Bapat: ‘मला शोधू शकता का तुम्ही?’ जुना फोटो पोस्ट करत प्रियाने विचारला चाहत्यांना प्रश्न?

भाजलेले जिरे पाण्यात टाकून प्या
जिरे हे एक उत्कृष्ट ॲसिड न्यूट्रलायझर म्हणून ओळखले जाते. यामुळे पचनाच्या समस्या तर दूर होतातच पण पोटदुखीपासूनही आराम मिळतो. जेवणानंतर थोडेसे भाजलेले जिरे कुस्करून एक ग्लास पाण्यात टाकून प्या. किंवा गरम पाण्यात एक चमचा जिरे टाकून प्या.

दालचिनीच्या चहाने पोटातील गॅस दूर करा
दालचिनी हा असा मसाला आहे जो चवीसोबतच शरीराच्या विविध भागांसाठी फायदेशीर आहे. हा एक सामान्य मसाला आहे जो नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करतो आणि पचन सुधारून पोट शांत करण्यास मदत करतो. याशिवाय, हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील संक्रमण बरे करू शकते. यासाठी रोज चहा प्यावा.

गरम पाण्यासोबत तुळशीच्या पानांचे सेवन करा
तुळशीच्या पानांमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो. यासाठी तुळशीची तीन ते चार पाने घेऊन खावी लागतील. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते गरम पाण्यात टाकूनही सेवन करू शकता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube