डासांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा

How To Get Rid Of Dengue Mosquitoes : डासांच्या चावण्याने तुम्ही आजारी पडू शकता हे तर आपला सर्वाना माहितीच आहे. डासांच्या चावण्याने डेंगू सारखा गंभीर आजार देखील होतो आणि काही घटनेमध्ये अनेकांचा या आजाराने मृत्यू देखील झाला आहे. अशा परिस्थितीत 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो आहे. डेंगू सारखा गंभीर आजाराला आपल्याला सामोरे जायचे नसेल तर तुम्ही काही उपाय देखील अवलंबू शकता.

दरम्यान डेंग्यूचे डास हे सकाळी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या 2 तास आधी सर्वाधिक सक्रिय असतात. याशिवाय, ते रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या ठिकाणी देखील उपस्थित असतात. प्रत्येकाच्या घराच्या खिडक्या, दरवाजे हे उघडे असतात यामुळे डास हे सहज घरात शिरतात. अशा परिस्थितीत संरक्षणासाठी त्यांचा घरात प्रवेश रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

पाण्याचे डबके नको
डेंग्यूचे डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा घरामध्ये किंवा आजूबाजूला पाणी तुंबलेली ठिकाणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.

खिडकीत जाळी
घरातील खिडक्या पूर्णपणे उघडल्यास बाहेरून आतमध्ये येणाऱ्या डासांसह अनेक प्रकारच्या कीटकांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आणि हवा आत येण्यासाठी खिडकीला बारीक छिद्रे असलेली जाळी बसवा.

कीटकनाशक फवारणी
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी डासांचे घर पूर्णपणे स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कीटकनाशक फवारणी वापरू शकता. मात्र ते वापरण्यापूर्वी त्यावर लिहिलेली खबरदारी नेहमी पाळा.

डासांनाही नैसर्गिकरित्या दूर करता येते
डासांचा नायनाट करण्यासाठी, रासायनिक कीटकनाशकांऐवजी, तुम्ही लसूण पाण्याचा स्प्रे, व्हिनेगर स्प्रे, कॉफी, लवंग आणि लिंबू आणि कडुनिंबाच्या पानांचा धूर देखील वापरू शकता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube