दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, पुण्यात 78 पदांची भरती सुरू, पगार 21 हजार 700

Untitled Design   2023 04 13T072106.964

आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. कारण दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढ आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारी नोकरी मिळण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. दरम्यान, तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि दहावी, बारावी पास असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण, पुण्यातील मुख्यालय दक्षिणी कमांड भरती बोर्ड पुणे (CSBO) ने नुकतीच काही रिक्त पदांच्या जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारा ग्रेड – 2, आणि गट C या पदांच्या रिक्त जागा ह्या भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज indianarmy.nic.in या वेबसाईटद्वारे ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. मुख्यालय दक्षिणी कमांड भरती बोर्ड, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या जाहिरातीत एकूण तब्बल 78 रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार आता या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती संस्थेने प्रकाशित केलेल्या नोटीफिकेशमध्ये देण्यात आली.

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती संस्थेच्या भरतासाठी अर्ज करतांना तुम्हाला तुमचा रेझ्युम, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळेची टीसी, कास्ट सर्टीफिकेट, ओळखपत्र (aadharcard or license), पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे अर्ज करतांना अर्जासोबत देणे आवश्यक आहे. दुसरं असं की, या भरतीसाठी रिसर्व वर्गातील उमेदवारांना वयाच्या मर्यादेत सुट देण्यात आलाी आहे. 7 मे2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण, अर्जात अनावधाने देखील कुठली त्रुटी राहिल्यास किंवा दिलेल्या तारखेनंतर अर्ज आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज हा बाद होईल, याची नोंद असावी.

पदाचे नाव – सिव्हिलिय स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड – 2, गट – क

एकूण पदे – 53
SC – 9
ST – 5
OBC – 11
EWS- 06
PWD – 02
ESM – 05

शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी पास किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा
18 ते 25 वर्ष

पगार – 21700 रुपये

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

फी– नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्यासाठी पत्ता
प्रभारी अधिकारी,
दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे
महाराष्ट्र – 411001

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1TtBQ5HFG-gTcSocTu08X5Wvf4piEkoIo/view

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

एकूण पदे – 25

पकाना – 11
बढई – 01
एमटीएस – 05
वासरमन- 02
सफाईवाला – 04
उपकरण दुरुस्ती – 01
टेलर – 01

शिक्षण
10 वी पास

वयाचे अट
30 एप्रिल रोजी 2023 रोजी 18 ते 25 वर्षा दरम्यान
ST/SC – 5 वर्षाची सुट
OBC – 3 वर्षाची सुट

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1pMyBOefHyHrJ5QQsVsSFeTxUlxvQ9w0w/view

● अर्ज करण्याची शेवटती तारीख – 7 मे 2023

●  अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या –
https://indianarmy.nic.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube