भारतीय नौदलात बंपर भरती, आजच अर्ज करा; पगार 35 हजार रुपये

भारतीय नौदलात बंपर भरती, आजच अर्ज करा; पगार 35 हजार रुपये

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरीच्या (job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय नौदलाने चार्जमन – II  पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय नौदलात चार्जमन – II च्या 372 पदांसाठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जाची प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 मे असणार आहे.

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन joinindiannavy.gov.in ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – चार्जमन – II

एकूण पदे – 372

पदांचा  तपशील
1. इलेक्ट्रिकल गट – 42 पदे
2. शस्त्र गट – 59 पदे
3. अभियांत्रिकी गट – 141 पदे
4. बांधकाम आणि देखभाल गट – 118 पदे
5. उत्पादन नियोजन आणि नियंत्रण गट – 12 पदे

‘फडणवीस चांगला माणूस, मला त्यांची कीव येते’; राऊतांचे फडणवीसांना खोचक टोले
वयोमर्यादा

पात्र उमेदवाराचे वय 18 ते 25 दरम्यान, असावे.

शैक्षणिक पात्रता
चार्जमन – II च्या सर्व पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे दिली जाते. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून योग्य विषयीतील पदवी धारण केलेली असावी.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार –
35, 400 रुपये

शुल्क –
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 278 रुपये भरणे आवश्यक आहेत. सर्व महिला एससी, एसटी, पीडब्ल्यू डी आणि ईएसडब्लु उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सुट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया –
– सुरूवातीला उमेदवारांनी joinindiannavy.gov.in  या वेबसाईटवर जावे.
– त्यानंतर जॉईन नेव्ही यावर क्लिक करा. आणि नंतर Waysb वर क्लिक करा.
– पुढे Civilian वर क्लिक करा आणि नंतर चार्जमन वर क्लिकर करा.
– अर्ज व्यवस्थित भरा.
– अर्ज भरतांना आवश्यक ती सगळी कागदपत्र अपलोड करा.
– अर्ज भरल्यानंतर अर्जाचे शुल्क भरा.

निवड प्रकिया –
1. Written Examination
2. Computer based test
3. Trade Test / Skill Test
4. Interview

जाहिरात पाहा – https://drive.google.com/file/d/1GHOUBVtVuogNOaCoU8VQpgTvmawVskkc/view

अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube