फाफडा, बिर्याणी अन् कंडोम्स; IPL फायनलवेळी मदमस्त चाहत्यांनी फोडला ‘SWIGGY’ला घाम

फाफडा, बिर्याणी अन् कंडोम्स; IPL फायनलवेळी मदमस्त चाहत्यांनी फोडला ‘SWIGGY’ला घाम

Swiggy Ordered List of CSK vs GT Final:  यंदाचा आयपीएल हंगाम काल समाप्त झाला. यावेळी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये जोरदार मुकाबला झाला. कालचा सामना हा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणार व प्रेक्षकांच्या संयमाचा अंत पाहणारा होता. ऐन उन्हाळ्यामध्ये या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. प्रेक्षकांना गर्मीमुळे घामाच्या धारा निघायच्या ऐवजी सामन्यातील उत्कंठेमुळे घामाने अंघोळ झाली.

या सामन्यात फलंदाजी करताना गुजरातने 214 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते. हे आव्हान पाहता चेन्नईचा संघ ही धावसंख्या पार करु शकेल का? याची शंका अनेकांच्या मनात येत होती. पण चेन्नईचे फॅन्स मात्र आपला थाला ( महेंद्र सिंह धोनी ) याच्या कामगिरीवर विश्वास ठेवून होते. या सामन्यात पावसाने व्यत्यय आल्याने हा सामना 15 ओव्हर्सचा करण्यात आला. यावेळी चेन्नईला 15 ओव्हर्समध्ये 171 धावांचे आव्हान देण्यात आले. चेन्नईने अतिशय अतितटीच्या या सामन्यात  हे आव्हान पार केले व पाचव्यांदा आयपीएलचा करंडक पटकावला.

 

Gautami Patil : “तु आहेस लय भारी, होतीस का माझी परी” गौतमी होणार बीडची सुनबाई?

पण यानंतर आता चर्चा मात्र दुसऱ्या गोष्टीचीच सुरु झाली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीने एक ट्विट केले आहे. तब्बल 1 लाख 20 हजार लोकांनी आयपीएल फायनल पाहताना बिर्याणीची ऑर्डर दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “सर्वाधिक ऑर्डर देण्यात आलेल्या पदार्थात बिर्याणीने या हंगामात किताब पटकावला आहे. 1 लाख 20 हजार लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली असून एका मिनिटाला बिर्याणीच्या 212 ऑर्डर येत होत्या”.

तसेच स्विगीने आणखी एक माहिती दिली आहे. Swiggy ने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, स्विग्गी इन्संट मार्टच्या माध्यमातून 2423 कंडोम्सची डिलिव्हरी करण्यात आली. असं दिसतंय की आज रात्री 22 पेक्षा जास्त खेळाडू खेळत आहे, असे स्विगीने म्हटले आहे. तसेच या पूर्ण हंगामात एकूण 3 लाख 68 हजार 353 जलेबी फाफड्याच्या आर्डर दिल्याची माहिती स्विगीने दिली आहे.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

स्विगीच्या या ट्विटवर क्रिकेट रसिकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, एलॉन मस्क प्लीज स्विगीला विकत घ्या, जेणेकरुन ते आपली डिलीव्हरी वेळेवर देतील. तर आणखी एकाने म्हटले आहे की, माही मार रहा है व त्याचे 2423 फॅन्ससुद्धा. तर ये है इंडिया का त्यौहार, असे एकाने म्हटले आहे. एकंदरितच स्विगीच्या या ट्विटवरुन आयपीएलच्या चाहत्यांनी स्विगीच्या डिलीव्हीर बॉयला घाम फोडला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube