Lata Mangeshkar : ‘स्वरमाऊली’ लतादीदींचे शेवटचे स्वप्न अखेर पूर्ण

Lata Mangeshkar : ‘स्वरमाऊली’ लतादीदींचे शेवटचे स्वप्न अखेर पूर्ण

समस्त जगात ज्यांची ‘स्वरमाऊली’  ( Swarmauli )  अशी ओळख होती ते नाव म्हणजे लता मंगेशकर ( Lata Mangeshkar )  होय. लतादीदींनी आपल्या गाण्याने गेली अनेक वर्षे सर्व लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचे निधन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे, पण आजही त्या आपल्यातच आहेत असे वाटते. त्यांचा आवाज आजही आपल्या सोबत आहे. त्यामुळे त्यांची आठवण सतत आपल्या ह्रदयाच्या जवळ आहे. लतादीदींनी फक्त गाणी गायली नाहीत तर त्यांच्या सामाजिक कामाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

लतादीदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक प्रकारची सामाजिक कामे केली. त्यांनी हॉस्पिटलसाठी, सैनिकांसाठी, अनाथांसाठी अनेक प्रकारची मदत केली. तसेच जे कलाकार आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात, त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना अगदी रहायला घर देखीन नसते, अशा कलाकारांसाठी 2021 साली लतादीदींनी स्वरमाऊली फाऊंडेशची स्थापना केली होती. या माध्यमातून त्यांनी वृद्ध कलाकारांसाठी वद्धाश्रम सुरु करण्याची संकल्पना मांडली होती. आज आता त्यांचे ते स्वप्न पूर्ण होत आहे. ज्या कलाकारांनी आयूष्यभर कलेची उपासना केली, त्यांच्यासाठी आता हक्काचे घर असणार आहे. लतादीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी सुद्धा त्यांचे काम आजही सुरु आहे.

याची माहिती गायक सोून निगम व अभिनेता सुबोध भावे यांनी इंस्टाग्रामवर  एक व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.  दरम्यान 2018 साली लता मंगेशकर यांना स्वरमाऊली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना त्यांच्या  ‘प्रभुकुंज’ निवास्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube