महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी नागरी दलितवस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना
LetsUpp | Govt.Schemes
राज्य शासन (Maharashtra Govt)योजनाकडून मागणीवरून नागरी भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांमधील (Neo-Buddhist elements) कुटुंबियांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये (Individual toilets)उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविली जाते
Ajit Pawar राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास सज्ज! पवारांसमोरच अनेकांना झापले…
योजनेची प्रमुख अट : नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक असणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे : मुख्याधिकारी, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे.
लाभाचे स्वरूप असे : नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबियांना खाजगी नळ जोडण्यांसाठी 4,000 रुपये /- प्रतिकुटुंब व वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये /- प्रतिकुटुंब याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
या ठिकाणी संपर्क साधावा : मुख्याधिकारी, संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यालय.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)