सावधान ! नवीन घर घेताय, मग या गोष्टींची नक्की काळजी घ्या

सावधान ! नवीन घर घेताय, मग या गोष्टींची नक्की काळजी घ्या

मुंबई : काहीजण आयुष्यभराची कमाई हे घर घेण्यासाठी घालत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये, याकरिता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5 मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (new home ) या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे का ? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे का ? घर खरेदीकरार महारेराने ठरवून देत असलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे का ? तुम्ही १० टक्के रक्कम घेऊन घरखरेदी, घर नोंदणी करत असल्यास विकासक घर विक्री करार करतोय का ? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करत आहात ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत का ? या सर्व काही गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक असणार आहे. घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित रहावी, याकरिता महारेराने ही मार्गदर्शक तत्वे नुकतीच जाहीर करण्यात आल्या आहेत.

प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल तर विकासकांना रेरा कायद्यानुसार ग्राहक हिताच्यादृष्टीने काही अटींची पूर्तता करण्यात यावी लागते. विकासकाकडे घर खरेदी, घर नोंदणीपोटी आलेली रक्कम दुसरीकडे खर्च न होता, त्याच प्रकल्पावर खर्च व्हावी यासाठी रेरा नोंदणी क्रमांकनिहाय बँकेत खाते उघडण्यात येते. या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांपैकी 70 टक्के रक्कम या प्रकल्पाच्या कामाकारिता या खात्यात ठेवण्यात येते. विकासाकाला हे पैसे केव्हाही काढता येत नाही. त्याकरिता त्याला प्रकल्प अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांच्याकडून कामाच्या टक्केवारीचे आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र घेऊनच या प्रमाणात पैसे काढता येत असतात. शिवाय विकासकाला दर तीन महिन्याला प्रकल्पस्थितीची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अध्ययावत करणे बंधनकारक असणार आहे. या प्रकल्पाविषयी काय काम सध्या सुरु आहे, कसे काम चालू आहे, काम कुठपर्यंत आलेय या आदी गोष्टीचा विषयी घरखरेदीदारांना घरबसल्या महारेराच्या संकेतस्थळावर बघून येऊ शकतात.

विकासकाला घर विक्री कराराअगोदर 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही. विकासक 10% पर्यंत रक्कम घेऊन घर नोंदणी घेत असेल किंवा घर विक्री करत असेल, तर विकासकाला घर विक्री करार करणे बंधनकारक असणार आहे.

याशिवाय महत्त्वाचे म्हणजे 1 जानेवारीपासून महारेराने नवनवीन प्रकल्पाच्या नोंदणीसाठी विकासकाबरोबरच्या संचालकांचा दिन क्रमांक याच्यासह या सर्वांच्या इतरही प्रकल्पाची सविस्तर माहिती, या नवीन प्रकल्पाची नोंदणी करताना नोंदवणे आता बंधनकारक असणार आहे. घर खरेदीदार या सर्व माहितीचा अभ्यास करत, या विकासकाच्या क्षमतेची चाचणी करत, सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकणार आहात.

या सर्व प्रक्रियात विकासकाबरोबर होणारा घर खरेदीकरार हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असतो. याविषयी महारेराने आदर्श खरेदीकरार जाहीर केलेला आहे. त्यात दैवी आपत्ती , चटई क्षेत्र दोष दायित्व कालावधी आणि प्रकल्प हस्तांतरण करार या बाबी महारेरा कायद्यानुसार आवश्यक असणार आहे, त्यात विकासकाला कोणताही बदल करता येत नाही. शिवाय आदर्श खरेदी करारात खरेदीदाराच्या संमतीने काही बदल करायचे राहिल्यास विकासक ते करू शकणार आहेत. परंतु खरेदीदाराला ते स्पष्टपणे कळावे याकरिता ते बदल अधोरेखित ( Underline) करणे बंधनकारक असणार आहे .

या करारातच हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची नोंद राहणार आहे. त्याची नोंद त्यांना महारेराच्या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. ज्यांच्या मार्फत आपण हा व्यवहार करत आहे, ते मध्यस्थ महारेराकडे नोंदणीकृत आहेत किंवा नाही, याचीही खात्री गुंतवणूकदाराने करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. महारेराने ठरवून दिलेल्या या सर्व 5 बाबींची काळजी घेऊन गुंतवणूक केल्यास ती गुंतवणूक सुरक्षित राहायला नक्की मदत होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube