धक्कादायक! सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत सर्वांत वरच्या क्रमांकावर; ब्राझील आणि स्पेनही मागे

India is the biggest target country for cyber attacks : नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतावर सायबर हल्ल्यांचा (Cyber attack) धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. सायबर हल्ल्यांचं फक्त प्रमाणच वाढलेलं नाही तर भारत सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर सर्वांत वरती आहे. अलिकडेच, स्विस सायबर सुरक्षा फर्म (ASwiss cyber security firm) ‘अॅक्रोनिस’च्या अहवालातून असे समोर आले आहे की, सायबर हल्ल्यांच्या यादीत भारत अव्वल स्थानावर आहे.
Video : मुळात प्रत्येक जण बायसेक्शुअल…; अभिनेत्री स्वरा भास्कर नेमकं काय म्हणाली?
या अहवालात नमूद केले आहे की, भारताने 2025 मध्ये सायबर हल्ल्यांचा सर्वांत मोठा लक्ष्य देश म्हणून ब्राझील आणि स्पेन यांना मागे टाकले आहे. मे महिन्यात, भारतात विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या 12.4 टक्के उपकरणांमध्ये मालवेअर आढळून आले होते. याचा अर्थ असा की, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्यांसोबत सायबर गुन्ह्यांच्या सर्वाधिक घटना घडतात आणि याचे जगात सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. त्यानंतर जूनमध्ये हाच आकडा 13.2 टक्क्यांपर्यंत वाढला होता. हा आकडा जगात सर्वाधिक आहे.
‘शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत’; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका
सायबर हल्ल्यांत प्रचंड वाढ
मिंटच्या अहवालात अॅक्रोनिसचा संदर्भ देत म्हटले आहे की, अधिकृत ईमेलवरील सायबर हल्ले 2024 च्या सुरुवातीला 20 टक्क्यांवरून 2025 च्या पहिल्या सहामाहीत 25.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. सायबर सुरक्षा कंपन्यांचे म्हणणे आहे की, सायबर गुन्हेगार आता क्रेडिट कार्ड आणि पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती काढण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहेत.
या उद्योगांना सर्वाधिक धोका
अहवालात म्हटले आहे की, जनरेटिव्ह एआयमुळे सायबर गुन्हेगारांसाठीचे टेक्निकल अडथळे कमी झाले आहेत. यामुळे आता फिशिंग ईमेल, बनावट इनव्हॉइस आणि अगदी डीपफेक स्कॅमही शोधणे प्रचंड कठीण झाले आहे. अॅक्रोनिसचे भारत आणि दक्षिण आशियाचे महाव्यवस्थापक राजेश छाब्रा म्हणाले की, कोविडनंतरच्या हायब्रिड वर्क मॉडेलमुळे कंपन्यांना रिमोट सेटअपमुळे सिस्टीम असुरक्षित झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सेवा आणि दूरसंचार उद्योग हे भारतातील सर्वांत धोकादायक क्षेत्रांपैकी एक आहेत.
मालवेअर म्हणजे काय?
मालवेअर हा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा कोड आहे जो हॅकर्स संगणक किंवा नेटवर्कमध्ये घुसण्यासाठी वापरतात. हॅकर्स या धोकादायक मालवेअरद्वारे डिव्हाइसचा ताबा घेतात. अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, भारताच्या डिजिटल इकोसिस्टमवर अनेक मोठे धोके टपून बसलेले आहेत.