Mahindra BE6 घरी आणा फक्त 5 लाखात; कसं काय? जाणून घ्या संपूर्ण गणित

Mahindra BE6 : महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात मोठा धमाका करत नवीन इलेक्ट्रिक कार महिंद्रा BE6 लॉन्च केली आहे. या कारमध्ये असणाऱ्या भन्नाट

Mahindra BE6

Mahindra BE6 : महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात मोठा धमाका करत नवीन इलेक्ट्रिक कार महिंद्रा BE6 लॉन्च केली आहे. या कारमध्ये असणाऱ्या भन्नाट फीचर्स अन् दमदार रेंजमुळे कार खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तुम्ही आता ही कार फक्त 5 लाखांचा डाऊन पेमेंट भरुन सहज घरी आणू शकतात. जर तुम्ही पाच लाख रुपये डाऊन पेमेंट भरून ही कार घरी आणली तर तुम्हाला किती मासिक हप्ता भरावा लागणार हे जाणून घ्या.

Mahindra BE6 किंमत

महिंद्रा BE6 भारतीय बाजारात Tata Curvv EV, MG Windsor EV, Hyundai Creta Electric आणि Vinfast VF6 यांसारख्या इलेक्ट्रिक SUV कार्सला टक्कर देत आहे. महिंद्रा BE6 ची बेस व्हेरिएंटची एक्स- शोरुम किंमत 18.90 लाखांच्या आसपास आहे. यानुसार या कारची ऑन-रोड किंमत अंदाजे 19.87 लाख रुपये इतकी होते. यामध्ये 19.90 लाख रुपयांची एक्स – शोरुम किंमत आणि 78000 रुपयांचे विमा शुल्क समाविष्ट आहे. तसेच इतर चार्ज देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

5 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतरचा EMI

जर तुम्ही या कारचे बेस व्हेरिएंट खरेदी केले तर बँक तुम्हाला एक्स-शोरूम किमतीवर आधारित  फायनान्स करेल. 5 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर, उर्वरित अंदाजे 18.87 लाख रुपयांची रक्कम तुम्हाला बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घ्यावी लागेल. जर बँकेने तुम्हाला 14.87 लाख रुपयांचे कर्ज, 9% व्याजदराने आणि सात वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केले, तर पुढील सात वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा केवळ 23,931 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

कार्यकर्ता आजारी असेल तर घर गहाण ठेवूनही मदत करेन पण…, कार्यकर्त्यांना मंत्री पंकजा मुंडेंचा इशारा –

Mahindra BE6 एकूण किंमत किती ?

जर तुम्ही बँकेकडून 14.87 लाख रुपयांचे कार कर्ज, सात वर्षांच्या कालावधीसाठी आणि 9% व्याजदराने घेतले, तर संपूर्ण सात वर्षांच्या कालावधीत तुम्हाला दरमहा 23,931 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. या सात वर्षांच्या कालावधीत, महिंद्रा BE6 साठी तुम्हाला व्याजापोटी अंदाजे 5.22 लाख रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड शुल्क आणि भरलेले व्याज या सर्वांची बेरीज केल्यास, या कारची एकूण किंमत अंदाजे 25.10 लाख रुपये इतकी होईल.

follow us