कार्यकर्ता आजारी असेल तर घर गहाण ठेवूनही मदत करेन पण…, कार्यकर्त्यांना मंत्री पंकजा मुंडेंचा इशारा
Pankaja Munde : माझ्याविरुद्ध कारस्थान केलेला माणूस आज दाकवा कुठंय. माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आर्शिर्वाद आहे. राजकारणात
Pankaja Munde : माझ्याविरुद्ध कारस्थान केलेला माणूस आज दाकवा कुठंय. माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आर्शिर्वाद आहे. राजकारणात हे होत राहतंय, मी पण पडले, पण ज्यांनी हे केले ते पुन्हा नकाशावरुन गायब होतात हे लक्षात ठेवा असं अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमात बोलताना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
अंबाजोगाई शहरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे यांनी लोकसभा 2024 निवडणुकीत झालेल्या पराभवावर भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला तसेच कार्यकर्त्यांना इशारा देत चुकीची कामे करु नका असा सल्ला देखील दिला.
यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, राजकारणात लोक बदमाश पण असतात तर काही चांगले पण असतात. काही लोक सोडून गेले, आपल्याला वापरुन निवडून येवून दुसऱ्याशी संधान करुन गडबड करत आहेत. करु द्या त्यांना काय कारयचं ते, माझ्याविरुद्ध कारस्तान केलेला माणूस आज दाखवा कुठंय, माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आर्शिर्वाद आहे. राजकारणात हे होत राहतंय. मी पण पडले, पण ज्यांनी हे केले ते पुन्हा नकाशावरुन गायब होतात हे लक्षात ठेवा, त्याला मला काहीच करावं लागत नाही. निसर्ग करतो काय करायचं ते चागलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सगळ्या शक्ती येतात, त्यामुळे तुम्ही माझी शक्ती आहात असं या कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आगामी निवडणुकीत या जिल्ह्याच्या सहा मतदारसंघात खासदारासह सहाही आमदार आमचेच होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात त्यांची जागा तुरुंगात
या कार्यक्रमात पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याकडून कोणत्याही घटनाबाह्य गोष्टींची अपेक्षा करु नये. काळ बदलला आहे, त्यामुळे स्वत: ची परिस्थिती आणि ऐपत ओळखून त्यात आनंदी राहणे शिका. पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिले आहे की, जे लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात किंवा फसवणूक करतात त्यांची जागा तुरुंगात आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींची अपेक्षा माझ्याकडून करु नका.
‘कोणीही राजा नाही’… ट्रम्प यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर; कारण काय?-
जर एखादा कार्यकर्ता आजारी असेल, त्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार असेल तर मी माझे घर गहाण ठेवूनही त्याला मदत करेन पण जर कोणी चुकीची कामे करुन किंवा फसवणूक करुन संकटात सापडले असेल तर त्याला मी मदत करणार नाही असं या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.