खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 पदांची मेगा भरती, 69 हजार रुपये मिळणार पगार

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (53)

Brihanmumbai Municipal Corporation Job Updates : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतेचं असं नाही. मात्र, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) विविध पदभरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 27 मे पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE

बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक कार्यकारी पदाच्या एकूण 1178 पदांची भरती करणार आहे. इच्छुक उमेदवार 27 मे ते 16 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कमाल वयाचे बंधन नाही. अर्ज केल्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर योग्य उमेदवाराची निवड केली जाईल.
तुम्ही भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

एकूण पदे – 1178
पदाचे नाव – सहाय्यक कार्यकारी

निवड प्रक्रिया
लेखी चाचणी,
कौशल्य चाचणी आणि मुलाखत

पगार
BMC मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल.

राजकारण करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागले; राम शिंदेंचं होळकरांना स्पष्टीकरण, रोहीत पवारांना टोला

शैक्षणिक पात्रता

i) उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून शालेय प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, विज्ञान, कला, कायदा किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा.

iii) टायपिंग आणि एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

प्रवेश शुल्क-

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये प्रवेश शुल्क आहे,
तर मागासवर्गीय उमेदवार 900 रुपये भरून शुल्क आहे.

राजकारण करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागले; राम शिंदेंचं होळकरांना स्पष्टीकरण, रोहीत पवारांना टोला

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण, अर्ज करताना अर्जात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जाहिरात पाहा –
https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/2023/05/30131521/Notification-BMC-Executive-Assistant-Posts.pdf

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 16 जून 2023
अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या : http://mcgm.gov.in

Tags

follow us