जिओ सिनेमाची मोफत सेवा होणार बंद; चित्रपट, क्रिकेट पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे
Money to be paid to watch ‘Jio Cinema’; जिओ सिनेमा (Jio Cinema) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे आयपीएल 2023 चा हंगाम. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही IPL 2023 चा सीझन विनामुल्य पाहू शकता. मग तुम्ही जिओ वापरकर्ते असो वा नसो, तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर आयपीएलचा सीझन मोफत पाहता येतो. पाच पैशाची खिशाला झळं न पोहोचू देता या प्लॅटफॉर्मवर मोफत आयपीएल पाहता येत असल्यानं क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कंपनी आपली सेवा सर्वांना मोफत देत आहे, परंतु यापुढं असं होणार नाही. लवकरच ही मोफत सेवा बंद होणार असून Jio सिनेमाचे पेड वर्जन आणि त्याच्या रीब्रँडिंगबाबत अनेक चर्चा होत आहेत.
जिओ सिनेमा हे एक अॅप असून यावर युजर्ससाठी सगळ्या प्रकारचा कंटेंट हा विनामूल्या आहे. अट एवढीच आहे की, फक्त आपल्या मोबाईलमध्ये रिचार्च असावा. रिचार्ज असेल तर आपल्याला सिनेमा, मालिका, आयपीएलचा मोफत आनंद घेता येतो. मात्र, अहवालांनुसार, कंपनी या प्लॅटफॉर्मला Jio Voot म्हणून रीब्रँड करू शकते. Voot हा Viacom 18 चा आणखी एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. आयपीएलच्या या सीझननंतर रिलायन्स जिओ सिनेमा आणि वूट एकत्र विलीन करणार असल्याची चर्चा आहे.
अमित शाह यांना फोन केल्याचं सिद्ध झाल्यास राजीनामा देईल; अफवांवर ममता बॅनर्जी संतापल्या
जिओचा प्लॅन काय?
ओन्ली टेकवरील एका कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून ही चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये JioVoot च्या सबस्क्रिप्शन प्लॅनचीही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून Jio त्याच्या OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema चे सतत प्रमोशन करत आहे. कंपनीने त्यावर फिफा विश्वचषक विनामूल्य प्रसारित केला होता.
ही सेवा केवळ जिओ वापरकर्त्यांसाठी नाही तर सर्वांसाठी विनामूल्य आहे. आयपीएल 2023 सीझनचे मोफत प्रक्षेपणही यावर होत आहे, परंतु ही सेवा फार काळ मोफत राहणार नाही असे दिसते. रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या 2023 या सीझननंतर Jio Cinema चे नाव बदलून जिओ वूट केले जाऊ शकते.
Jio Voot च्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागतील
अलीकडेच, रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत याबद्दल एक संकेत दिला. लवकरच जिओ सिनेमात नवे बदल आणि नवीन कंटेंट्स पाहायला मिळतील, असे त्यांनी सांगितले होते. रीब्रँडिंग त्याचा एक भाग असेल असे दिसते. याशिवाय, कंपनी स्वत:ला IPL 2023 नंतर सबस्क्रिप्शन मॉडेलवर स्विच करण्याची शक्यचता आहे. याबाबतही ज्योती देशपांडे यांनी मुलाखतीत बोलतांना सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, नवीन कंटेटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनी अंतिम किंमतीवर काम करत आहे. अहवालानुसार, JioVoo चे सबस्क्रिप्शन रु.99 पासून सुरू होऊ शकते.