मुंबई MIDC मध्ये विविध पदांची भरती, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख

मुंबई MIDC मध्ये विविध पदांची भरती, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख

Mumbai MIDC Various Post Recruitment : मुंबईत नोकरी (Job) मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (Maharashtra Industrial Development Corporation) अनेक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर या भरतीचे नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कामकाज जलदगतीने होण्यासाठी 11 महिन्यांच्या करारासह काही रिक्त जागांवर या भरती अंतर्गत भरती केली जाणार आहे. वेबसाईटवर प्रकाशित आलेल्या नोटिफिकेशनमध्ये शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची तारीख यांचा सविस्तर तपशील दिला आहे.

या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी 17 एप्रिल ते 24 एप्रिल 2023 या कालावधीत कार्यालयीने वेळेत अर्ज प्रत्यक्ष सादर करता येतील किंवा आपण gmhrd@midcindian.org या ईमेलवर सुध्दा अर्ज पाठवू शकता. ही भरती प्रक्रिया 16 जागांसाठी राबवण्यात येणार आहे.

या पदभरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करताना आपला रिझ्युम, 10 वी, 12 वी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखल, ओळखपत्र, आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे, या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता धारक उमेदवारांनी संस्थेने प्रसिध्द केलेले नोटिफिकेशन नीट काळीजपूर्वक वाचावे. कारण, अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

पदाचे नाव –

तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक

एकूण पदे – 16

शैक्षणिक पात्रता

अर्ज केलेल्या पदाचा अनुभव (किमान 5 वर्ष) असणं आवश्यक

वयोमर्यादा

किमान वर्ष 58 व कमाल वय 65 वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई

Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?

आवश्यक कागदपत्रे

शासकीय संस्थेकडील सेवानिवृत्तीचा आदेश

शैक्षणिक अर्हता व इतर परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतच्या छायांकित प्रती

अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो साक्षांकित करून चिकटवावा.

आधार कार्ड व पॅनकार्ड प्रत

सेवानिवृत्तीचे वेळी मिळणारे वेतनाचा पुरावा

अर्ज पध्दती – ऑनलाईन (ई-मेल)

ईमेल पत्ता – gmhrd@midcindian.org

निवड प्रक्रिया
मुलाखत

मुलाखतीच्या वेळी कागदपत्रांच्या मूळ पर्ती सोबत आणाव्यात.

मुलाखतीचे ठिकाण
बर्वे सभागृह,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,

उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग,
अंधेरी (पूर्व), मंबई – 400 093

जाहिरात :
https://drive.google.com/file/d/1zBGbEwQO-4wADSsYTZsr7YdX6SSrVh5_/view

अर्ज करण्याची शेवटची तारीख
24 एप्रिल 2023

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : www.midcindia.org

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube