खास मुरमुऱ्यांचे पोहे

खास मुरमुऱ्यांचे पोहे

साहित्य :

250 ग्रॅम कुरमुरे
1 कप शेंगदाण्याचे तेल
1 चमचे मोहरीच्या बिया
2 चमचे चणा डाळ
1 चमचे उडदाची डाळ
2 चमचे बेसन
1 चमचे रेड चिली पावडर
आवश्यकतेनुसार मीठ
2 कप कांदा
2 कप टोमॅटो
आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
आवश्यकतेनुसार कढीपत्ता
आवश्यकतेनुसार हळद
आवश्यकतेनुसार कोथिंबीरीची पाने

कृती :

Step 1: मोहरी, चणा डाळ व उडदाची डाळ अशी सर्व सामग्री २ ते ३ मिनिटे तेलात चांगली परतून घ्या
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घाला व तडतडू द्या. आता यामध्ये चणा डाळ, उडदाची डाळ घालून सर्व सामग्री २ ते ३ मिनिटे चांगली परतून घ्या.

Step 2: आता यामध्ये हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घाला
आता यामध्ये हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून सर्व साहित्य पुन्हा एकदा २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या.

Step 3: कांद्यामध्ये टोमॅटो, लाल तिखट व बेसन पीठ घालून मिश्रण चांगलं शिजवून घ्या
कांद्याचा रंग गोल्डन-ब्राऊन होऊ लागताच त्यामध्ये टोमॅटो, १ चमचा लाल तिखट व बेसन पीठ घाला आणि मिश्रण चांगलं शिजवून घ्या.

Step 4: कुरमुरे स्वच्छ धुवून घेऊन तयार केलेल्या मिश्रणात घाला.
मिश्रण थंड होण्यासाठी ठेऊन द्या व कुरमुरे स्वच्छ धुवून घेऊन तयार केलेल्या मिश्रणात घाला. कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण गॅसच्या मध्यम आचेवर चांगले मिक्स करा.

Step 5: तयार आहेत कुरमु-यांचे हेल्दी व टेस्टी पोहे!
मिश्रण चांगलं एकजीव करून २ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. तयार आहेत कुरमु-यांचे हेल्दी व टेस्टी पोहे!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube