पोहे कटलेट रेसिपी

पोहे कटलेट रेसिपी

साहित्य- तीन उकडलेले बटाटे, दोन वाट्या भिजवलेले पोहे, एक कांदा बारीक चिरलेला, एक टीस्पून चाट मसाला, १ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल मिरची पावडर, आला-लसूण पेस्ट, अर्धे लिंबू, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार

कव्हरसाठी: एक वाटी तांदूळ पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, ब्रेड क्रम्ब्स

कृती- एका भांड्यात उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या. त्यात भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, एक टीस्पून चाट मसाला, एक चमचा हळद, १-१/२ चमचा लाल मिरची पावडर, आला-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार घालून एकत्र करा. तांदूळ पीठ, कॉर्नफ्लोअर आणि मीठ एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. वरील मिश्रणाचे चपट्या आकाराचे गोळे करून तांदूळ आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून नंतर ते ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवावे. नंतर तेलात तळून घ्यावं. सॉस किंवा पुदिना चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube