पोस्ट ऑफिस RD योजना: दरमहा 2,000 जमा करा आणि मिळवा 1 लाख 42 हजार

Post Office RD Scheme: सध्या जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस आरडी योजनेवर वार्षिक 6.7 टक्के व्याजदर दिला जात आहे.

  • Written By: Published:
RD POST OFFICE

Post Office RD Scheme : पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. तसेच पोस्ट ऑफिसच्या योजनेतून बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळते. त्यामुळे नागरिक या योजनांमध्ये (Post Office RD Scheme) पैसे गुंतवणूक करतात. त्यातून चांगला फायदा मिळते. अशाच एक योजनेबाबत लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया…

सध्या जुलै ते सप्टेंबर 2026 या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस आरडी योजनेवर वार्षिक 6.7 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत व्याजाची गणना तिमाही चक्रवाढ पद्धतीने केली जाते. जर तुम्ही दर महिन्याला दोन हजार रुपये गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळू शकतात. याचे गणित पाहूया…तुम्ही दरमहा दोन हजार रुपये आरडीमध्ये भरल्यास पाच वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. तुम्ही 60 महिने दोन हजार रुपये भरल्यास गुंतवणूक होते एक लाख 20 हजार रुपये. 6.7 वार्षिक तिमाही चक्रवाढ व्याज 22 हजार 732 रुपये मिळतील. 0तिमाही चक्रवाढ व्याजामुळे साध्या व्याजाच्या तुलनेत अधिक परतावा मिळतो. म्हणजेच पाच वर्षांनी 1 लाख 42 हजार 732 रुपये रक्कम तुम्हाला मिळणार आहे.


कोण खाते उघडू शकतो?

पोस्ट ऑफिस RD खाते केवळ ₹100 प्रति महिना जमा करून सुरू करता येते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार किती रक्कम जमा करता येते.


5 वर्षांपूर्वी खाते बंद करता येते का?

आकस्मिक आर्थिक गरज भासल्यास तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर RD खाते मुदतपूर्व बंद करता येते. मात्र, अशा परिस्थितीत नियमानुसार कमी व्याज मिळू शकते. त्यामुळे अंतिम परताव्यावर परिणाम होतो.


कर नियम काय आहेत?

पोस्ट ऑफिस RD मधील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत मिळत नाही. लागू असलेल्या नियमांनुसार, ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त व्याज मिळाल्यास त्यावर TDS (Tax Deducted at Source) लागू होऊ शकतो.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय
पगारदार कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित बचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस RD योजना हा एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित बचतीचा पर्याय आहे. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूळ गुंतवणूक आणि त्यावरील व्याजाची संपूर्ण रक्कम एकत्रितपणे खात्यात जमा केली जाते.

follow us