Punjab and Sind Bank : पंजाब & सिंड बॅंकेत 183 पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

Punjab and Sind Bank : पंजाब & सिंड बॅंकेत 183 पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

Punjab and Sind Bank Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांपासून सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होताहेत.  बँकिंग क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. तुम्हीही बॅंकेत नोकरीची संधी शोधात असाल तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशलिस्ट ऑफिर्सच्या (Specialist Offers) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार पंजाब अँड सिंध बँकेच्या punjabandsindbank.co.in या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या बँक भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 28 जून रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे पंजाब आणि सिंध बँकेत एकूण 183 पदांची भरती केली जाणार आहे. (Punjab & Sind Bank Recruitment for 183 Posts)

एकूण पदे – 183

रिक्त जागा तपशील-
आयटी अधिकारी: 24पदे
राजभाषा अधिकारी: 2 पदे
सॉफ्टवेअर डेव्हलपर: 20 पदे
कायदा व्यवस्थापक: 6 पदे
चार्टर्ड अकाउंटंट: 33 पदे
आयटी व्यवस्थापक: 40 पदे
सुरक्षा अधिकारी: 11 पदे
राजभाषा अधिकारी: ५ पदे
डिजिटल व्यवस्थापक: 2 पदे
फोर ऑफिसर : 6 पदे
मार्केटिंग किंवा रिलेशनशिप मॅनेजर: 17 पदे
तांत्रिक अधिकारी: 1 पद
डिजिटल व्यवस्थापक: 2 पदे
रिस्क व्यवस्थापक: 5 पदे
फोअर डीलर: 2 पदे
ट्रेझरी डीलर: 2 पदे
फोअर ऑफिसर: 2 पदे
अर्थतज्ज्ञ अधिकारी: 2 जागा

पगार –
JMGS-II: ₹36०००-63840
MMGS-II: ₹48170-69810
MMGS-III: ₹63840 -78230

मी अन् फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार; घाटगेंच्या विधानाने मुश्रीफांना धडकी
पात्रता निकष :

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते, अधिसूचनेमध्ये  दिलेली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमदेवारांची वयोमर्यादा 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.
अनुसुचित जाती, जमाचीच्या उमेदावारांना 5 वर्ष वयात सवलत दिली जाणार आहे. तर विकलांग व्यक्तींना 3 वर्षाची सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया  :
निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी, उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल.  जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील, त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

अर्ज फी  :
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹150/- + GST
आणि इतरांसाठी ₹850/- + GST असं शुल्क लागू आहे.

अर्ज कधी करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी PSB च्या वेबसाइटवर 28/06/2023 ते 12/07/2023 पर्यंत  ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्याhttps://punjabandsindbank.co.in/

जाहिरात : https://punjabandsindbank.co.in/system/uploads/recruitment/2150_2023062715004561646.pdf

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube