पंजाबी छोले रेसिपी

पंजाबी छोले रेसिपी

साहित्य :

1 कप हरभरा
2 मध्यम कांदा
1 कप टोमॅटो पेस्ट
1/2 चमचे लसूूण पेस्ट
1/2 चमचे आल्याची पेस्ट
1 चमचे शेंगदाण्याचे तेल
आवश्यकतेनुसार पाणी
आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
1 चमचे जिरे
1 piece दालचिनीची काडी
1 – काळी वेलची
2 आवश्यकतेनुसार तेजपत्ता
आवश्यकतेनुसार लवंग
आवश्यकतेनुसार हिरवी वेलची
1 चमचे तूप
आवश्यकतेनुसार मीठ
1/4 चमचे हळद
आवश्यकतेनुसार हिंग
1/2 चमचे रेड चिली पावडर
1 चमचे कसूरी मेथी पावडर
1 चमचे सुक्या आंब्याची पावडर
1 चमचे कोथिंबीर पेस्ट
1 चमचे डाळिंबाच्या बिया

कृती :

Step 1: छोले शिजवून घ्या
एक कप छोले सात ते आठ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. यानंतर प्रेशर कुकरमध्ये भिजलेले छोले, अर्धा कप चहाचा काढा, तेजपत्ता, मोठा वेलदोडा, दालचिनीचा तुकडा, वेलची, लवंग आणि थोडं पाणी एकत्र घ्या. सर्व मिश्रण सहा ते सात शिट्ट्या येईपर्यंत शिजवा.

Step 2: तेलात कांद्याची पेस्ट फ्राय करा
पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये कांद्याची पेस्ट घाला आणि तीन ते चार मिनिटांसाठी परतून घ्या. यानंतर लसूण- आल्याची पेस्ट मिक्स करा आणि सामग्री दोन मिनिटांसाठी शिजवा.

Step 3: टोमॅटो पेस्टसह हळद-तिखट मिक्स करा
आता टोमॅटोची पेस्ट पॅनमध्ये मिक्स करा. थोड्या वेळानंतर हिंग, हळद, लाल तिखट, धणे पूड, डाळिंबाच्या दाण्यांची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण ३-४ मिनिटे शिजवा.

Step 4: पॅनमध्ये पाणी ओता
थोडंसं पाणी ओतून सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्या

Step 5: छोल्यांमधील गरम मसाला बाहेर काढा
छोले शिजल्यानंतर प्रेशर कुकरमधील गरम मसाला बाहेर काढावा. यानंतर कुकरमध्ये पॅनमधील मसाला मिक्स करावा. सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या.

Step 6: कसूर मेथी पावडर
आता चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी पावडर घालून सर्व सामग्री दोन शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.

Step 7: तुपाची फोडणी
आता दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणीसाठी तूप गरम करत ठेवा. लसूण- हिरव्या मिरच्या तेलात मिक्स करा. सर्वात शेवटी भाजलेले जिरे घाला व सर्व सामग्री फ्राय करून घ्या.

Step 8: तयार आहेत गरमागरम पंजाबी छोले
भाजीमध्ये छोले मसाला देखील घालावा. गरमागरम पंजाबी छोल्यांचा आपल्या कुटुंबीयांसोबत आस्वाद घ्यावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube