डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयुर्वेद विश्वविद्यालयात नोकरीची संधी, 639 पदांची बंपर भरती, पगार 1 लाख रुपये

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयुर्वेद विश्वविद्यालयात नोकरीची संधी, 639 पदांची बंपर भरती, पगार 1 लाख रुपये

Rajasthan Ayurveda Department Recruitmnet 2023 : राजस्थान आयुर्वेद विभागाअंतर्गत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विश्वविद्यालयामध्ये (Dr. Sarvepalli Radhakrishnan at Rajasthan Ayurved University) असिस्टेंट मेडिकल ऑफिस पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी 31 मे 2023 पर्यंत किंवा त्या आधी अर्ज करू शकतात. जे उमेदवार  या पदासाठी अर्ज करू इच्छितात, ते DSRRAU च्या अधिकृत संकेस्थळावर  educationsector.rajasthan.gov.in जाऊन अर्ज करू शकतात.

या भरतीचे राजस्थान आयुर्वेद विभागाने नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोटिफिकेशमध्ये शैक्षणिक पात्रती, वयोमर्यादा, वेतन, अनुभव, अर्जाची तारीख या सगळ्या बाबींचा सविस्तर तपशील दिला आहे. या भरती प्रकिये अंतर्गत एकून 639 पदांवर भरती केली जाणार आहे. जे  उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी सर्वांत आधी नोटिफिकेशनमद्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी. आणि मगच आपला अर्ज भरावा.  कारण, उमेदवारांकडून अर्जात काही त्रुटी असल्यास संस्थेकडून तो अर्ज बाद करण्यात येईल. भरतीसाठी अर्ज करताना पात्रता धारक उमेदवारांनी आपले दहावी, बारावीचे प्रमाणपत्र आणि अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रं अर्जासोबत जोडावी. याशिवाय,  शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला,  ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

पदाचे नाव – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

एकूण जागा  – 639

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी विद्यापीठ किंवा संस्थेतून आयुर्वेदातील पदवी (BAMS) किंवा समकक्ष आणि भारतीय औषध केंद्रीय परिषद कायदा 1970 अंतर्गत मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

Pandharpur Vitthal Mandir कायमस्वरूपी ताब्यात ठेवू शकते? राज्य सरकारला स्पष्टीकरणाचे न्यायालयाचे निर्देश
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2024 पर्यंत कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष असले पाहिजे.

वेतन
राजस्थान आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी या पदासाठी राज्य सरकारने दिलेल्या सातव्या वेतनश्रेणीनुसार, वेतन मॅट्रिक्स स्तर-14 आणि वेतनश्रेणी रुपये 56100-100000/- निश्चित करण्यात आली आहे.

जाहिरात
http://dsrrau.info/uploads/mo_2023.pdf

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळा भेट द्या : www.dsrrau.info

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube