RBI कडून शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर निर्बंध लागू ? काय आहे प्रकरण वाचा..
मुंबई : आरबीआयने (RBI) ५ सहकारी बँकांवर (Cooperative Banks) विविध निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये पैसे काढण्यावर बंदी देखील समाविष्ट आहे. या बँकांवर निर्बंध ६ महिने कायम राहणार आहेत. (RBI Office Attendant) यामुळे या बँकेचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. तसेच या बँका (RBI Banned 5 Banks) आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नवीन ग्राहकाला कर्ज देऊ शकणार नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, या बंदीचा आढावा घेतला जात आहे. याचा अर्थ या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊनच ही बंदी हटवण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय मध्यवर्ती बँक घेणार आहे. आरबीआयला बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसले तर बंदी उठवली जाणार आहे. या बँकांचा परवाना रद्द करण्यात आला नाही, असे आरबीआयने यावेळी सांगितले आहे.
या ५ बँकांवर घातली बंदी
रिझव्र्ह बँकेने एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लखनौ (यूपी), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद (महाराष्ट्र), शिमशा को-ऑपरेटिव्ह बँक नियामिथा मद्दूर, (कर्नाटक) उरावकोंडा. को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँकांवर निर्बंध घातले आहेत. या बँकांचे ग्राहक सध्याच्या तरलतेच्या संकटामुळे त्यांच्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाहीत.
उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक आता त्यांच्या बँकेमधील ठेवींमधून फक्त ५ हजार रुपये काढू शकतात. याचा अर्थ असा की ग्राहकाच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी तो त्याच्या खात्यातून फक्त ५ हजार रुपये काढू शकणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, पाचही सहकारी बँकांच्या पात्र ठेवींना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असणार आहे.