रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा,  763 रिक्त जागांवर होणार भरती, शिक्षण विभागाचा निर्णय

रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा,  763 रिक्त जागांवर होणार भरती, शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे : राज्यात 2018 मध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू होऊन प्रलंबित राहिलेल्या शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) मार्ग आता मोकळा झाला आहे.  शिक्षण विभागाने (Department of Education) 196 संस्थांमधील 763 रिक्त जागांसाठी मुलाखतीयोग्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात  केली असून, संबंधित उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी शैक्षणिक संस्थांमार्फत 18 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. (Recruitment of teachers for 763 vacancies)

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. सन 2018 मध्ये पवित्र प्रणालीद्वारे एकूण 12 हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये सुरुवातीला सहा ते सात हजार पदांची भरती करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया  रखडली होती. त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.  आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील 30 हजार रिक्त पदांवर पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. यासोबतच रखडलेल्या भरती प्रक्रियेतील 196 संस्थांमधील 763 रिक्त पदांसाठीही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Opposition Meeting : आता ही लढाई ‘INDIA’ विरुद्ध ‘NDA’, राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं…

मुलाखतीसह पदभरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) प्रवर्गासाठी  जागा असणाऱ्या संस्थांपैकी ज्या संस्थांच्या जाहिरातीमध्ये (समांतर आरक्षणाशिवाय) खुल्या प्रवर्गासाठी जागा नाहीत, अशा उर्वरित 196 संस्थांसाठी SEBC श्रेणीसाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्यात सहावी ते बारावी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यायत येत आहे. या संस्थांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्यांसाठी पूर्वीच्या तरतुदीनुसार एाक जागेसाठी दहा उमेदवार (समांतर आरक्षण असलेल्या उमेदवाराच्या उपलब्धतेच्या मर्यादीत) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

यासाठी एकूण 763 पदांवर शिक्षण निवडीसाठी तब्बल 5 हजार 535 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट,  विषय आणि आरक्षण लक्षात घेऊन संस्थाकडून निवड केली जाईल. मुलाखत आणि अध्यापन कौशल्याच्या माध्यमातून निवड झालेल्या आणि शाळेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना शालार्थ प्रणालीद्वारे पैसे दिले जातील, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube