रुपयाची 95 पर्यंत नीचांकी गंटागळी; आता गुंतवणूकदारांनी करावे तरी काय ?

Rupee -.गुरुवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरसमोर सुमारे 95.35 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.

  • Written By: Published:
Rupees Fall

Rupee at record low of Rs 95: इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम भारतावर होत आहे. कच्चा तेलाची वाढती किंमत, परदेशी गुंतवणूकदार हे भारतीय शेअर बाजारातून भांडवल काढत आहेत. तर अमेरिकन डॉलरचा (Doller) थेट परिणाम भारतीय रुपयावर (Rupee) होत आहे. आता तर रुपयाची घसरण एेतिहासिक नीचांकी पातळीवर होत आहे. गुरुवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरसमोर सुमारे 95.35 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.

इंधनाच्या किंमती भडकल्या आहेत. सध्या ब्रेट क्रूडची किंमत 126 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. ही किंमत युद्धाच्या सुरुवातीपासूनची सर्वाधिक पातळीवर आहेत. त्यातच अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तेलाच्या बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारत हा बहुतांश तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो आहे. यावर्षी आतापर्यंत रुपया जवळपास 6 टक्क्यांनी घसरलाय. ही घसरण केवळ अल्पकालीन चढउतार नाहीत, दीर्घकालीन आर्थिक दबावाचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रुपया कमजोर झाल्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर दिसू लागतो. कमकुवत रुपयामुळे आयात महाग होते, ज्यामुळे इंधन, खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढतात, त्याचा थेट फटका अर्थव्यवस्थाला बसतो असे क्वांटम एएमसीच्या फंड मॅनेजर स्नेहा पांडे यांनी सांगितले.

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे भारताचे आयात बिल वाढत आहे. तर दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदार सातत्याने देशांतर्गत बाजारातून पैसे काढून घेत आहेत. त्याच वेळी यूएस फेडरल रिझर्व्हच्या कठोर आर्थिक धोरणामुळे मजबूत झालेल्या अमेरिकन डॉलरने उदयोन्मुख बाजारपेठेतील चलनांवरील दबाव वाढवला आहे.

तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढते, तर दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदार भांडवल काढून घेत असल्याने रुपया आणखी कमकुवत होतो. कोटक सिक्युरिटीजचे कॅमोडिटी आणि करन्सी रिसर्चचे प्रमुख अनिंद्या बॅनर्जी स्पष्ट सांगतात की, तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून काढलेले भांडवल हे एकमेकांना बळ देतात, ज्यामुळे चलनावर दबाव कायम राहतो. त्यामुळे शेअर बाजारांसाठी यामुळे एक विभाजित कल (स्प्लिट ट्रेंड) निर्माण होतो. आयटी आणि वस्त्रोद्योगासारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांना डॉलरमधील कमाई सुधारल्याने फायदा होऊ शकतो, तर विमान वाहतूक, तेल विपणन आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या आयात-प्रधान क्षेत्रांच्या नफ्यावर दबाव येऊ शकतो. निर्यातदार अधिक मजबूत, आयातदार कमकुवत दिसू शकतात आणि अस्थिरता कायम राहू शकते, असे पांडे नमूद करतात.

तर गुंतवणूकदारांसमोर एक वेगळे आव्हान आहे. चलनाची कमजोरी महागाई वाढवू शकते, ज्यामुळे वास्तविक परतावा कमी होतो. त्याच वेळी, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकदा वापरले जाणारे वाढते व्याजदर, बॉण्डवरील परतावा (यील्ड) वाढवू शकतात, ज्यामुळे सध्याच्या गुंतवणुकीच्या किमतींवर परिणाम होतो, असे पांडे यांनी स्पष्ट केले.


किरकोळ गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

जागतिक घटक, तेलाच्या किमती, भू-राजकारण, भांडवली प्रवाह यामुळे चनलाच्या दराचा अंदाज लावणे कठीण जाते. त्यामुळे रुपयाच्या चढ-उताराचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक चढ-उतारावर प्रतिक्रिया दिल्याने चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याऐवजी, एक लवचिक पोर्टफोलिओ तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पांडे म्हणतात आणि विविध मालमत्ता वर्गांमध्ये (ॲसेट क्लासेस) गुंतवणूक आणण्यावर भर देतात.

शेअर्स, कर्ज रोखे, सोने अशा वेगवेगळ्या प्रकारात गुंतवणूक केल्यास जोखीम संतुलित होते. विशेषतः, चलनाची कमजोरी आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोने (संरक्षण) म्हणून काम करू शकते. मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंडांचा विचार करणे, जे इक्विटी, डेट आणि सोन्यामध्ये गुंतवणूक विभागतात आणि वेळोवेळी पुनर्संतुलन करतात. यामुळे पोर्टफोलिओमध्ये वारंवार बदल न करता अस्थिरता संतुलीत करता येते.

एसआयपीधारकांनी काय करावे ?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एसआयपी (SIPs) च्या बाबतीत गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध राहिले पाहिजे. बाजार आणि चलनातील अस्थिरता हे गुंतवणुकीच्या चक्राचा एक भाग आहे. या अनिश्चित टप्प्यांमध्ये गुंतवणूक थांबवल्यास त्याचा दीर्घकालीन विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एसआयपी सुरूच ठेवावी.

follow us