ते महायुतीत राहणार नाहीत तेव्हाच… सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार सहमत मात्र रोहित पवारांचे परखड भाष्य

Rohit Pawar सुप्रिया सुळे यांनी पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हटलं त्यावर रोहित पवार यांनी मात्र परखड भाष्य केलं.

Rohit Pawar

Sunetra Pawar agrees with Sule’s statement, but Rohit Pawar’s strong commentary : एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असं म्हटलं तर त्यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील एका वाक्यात भाष्य केलं आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे याचे भाचे आणि शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र परखड भाष्य करत पवार विरुद्ध पवार का करावं लागलं? याची कारण मिसांसा केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

सुप्रिया सुळे यांच्या नंतर रोहित पवार यांनी देखील वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुळेंच्या पवार विरुद्ध पवार या वक्तव्यावर परखड मत मांडलं. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, सुप्रिया ताईंनी जी भूमिका घेतली ती भावनिक होऊन घेतली कदाचित ती राजकीय देखील असू शकेल. मात्र पवार विरुद्ध पवार का झालं? भाजप विरुद्ध किंवा महायुती विरुद्ध निवडणूक लढवण्याची ही भूमिका घेण्यात आली होती. राजकारणात आज एक आणि उद्या दुसरं असतं त्यामुळे सध्या जे महायुतीत आहेत ते महायुती राहणार नाहीत. तेव्हाच पवार विरुद्ध पवार होणार नाही. असे म्हणत रोहित पवार यांनी आपलं मत मांडलं.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

नागपूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजित पवारांच्या निधनानंतर मी पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहे. एवढं ऊन असताना देखील कार्यकर्त्यांचा उत्साह भरपूर आहे. हे केवळ अजित दादांवरील प्रेम आहे. त्याचबरोबर जेव्हापासून मी राजकारणात आले आहे. तेव्हापासून मी नेहमी हेच सांगत आले आहे. आमचे कुटुंब वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे. त्यामुळे सुप्रिया ताईंनी सांगितलेली गोष्ट अतिशय चांगली आहे. त्यांनी पवार विरुद्ध पवार लढू नये असं वक्तव्य केलं आहे. ते अतिशय चांगला आहे. आमची सगळ्यांची देखील हीच इच्छा आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, मी कधीही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. यावेळेस मी होऊ देणार नव्हते. पण आता दादा नाहीत, त्यामुळे काही गोष्टी सांगण्याचे गरजेचे वाटत नाही. जे झाले ते गंगेला वाहिले. पण येथून पुढे मी कुठल्या पवाराच्या विरुद्धात लढणार नाही. वेळ पडली तरी दुसरा निर्णय घेईल. हे परत मी होऊ देणार नाही.

 

follow us