स्वामींच्या प्रकट दिनी कडक मराठीची भक्तांना खास पर्वणी; मंत्रमुग्ध करणारा तारकमंत्र प्रदर्शित
Shri Swami Samarth Prakatdin Tarakmantra Release : भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जाणारे श्री स्वामी समर्थ ( Shri Swami Samarth ) यांचा आज प्रकट दिन ( Prakatdin ) आहे. या प्रकट दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट सह राज्यघरातील विविध स्वामींच्या मंदिरात गर्दी करतात. तसेच याच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त कडक मराठी या यूट्यूब चॅनलने स्वामींच्या भक्तांना एक खास पर्वणीस दिली आहे. असंख्य भक्तांच्या मुखी कायम असणारा स्वामींचा तारक मंत्र ( Tarakmantra Release ) म्हणजेच ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
गावरान मेवा या वेब सिरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या कडक मराठी यूट्यूब चॅनलवर नेहमीच अध्यात्मिक गोष्टी दाखवल्या जातात. गेल्यावेळी अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी गावरान मेवा या वेब सिरीजचाखास एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता श्री स्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिन आहे. या प्रकट दिनानिमित्त असंख्य भक्तांच्या मुखी कायम असणारा स्वामींचा तारक मंत्र म्हणजेच ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
Sangli Loksabha : ठाकरे गटाने एकतर्फी निर्णय घेतला; विश्वजित कदमांचा आरोप
हे गाणं रिलीज होताच काही तासांमध्ये हजारो प्रेक्षक आणि भाविकांनी पाहिलं आहे. हे गाणं कडक मराठी या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे. तसेच त्याची निर्मिती अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एन्टटेंन्मेंट्स अॅण्ड कडक भक्ती, नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून करण्यात आली आहे. या गाण्याच्या गायन आणि संगीताविषयी सांगायचं झाल्यास,
शरद पवार अंतिम क्षणी निर्णय घेऊ शकत नाही; घडलेल्या घटनेचं उदाहरण देत पटेलांनी पटवून दिलं
हे गाणं गायक संकेत रहाडे यांनी गायलं आहे. असंख्य भक्तांच्या मुखी कायम असणारा स्वामींचा तारक मंत्र म्हणजेच ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हे गाणं मूळ असून त्याला संकेत रहाडे यांनी पुन्हा एकदा संगीतबद्ध केलं आहे. ही संकल्पना देखील संकेत रहाडे यांचीच असून तिचं नेतृत्व ओम रहाडे यांनी केलं आहे.
आंबेडकरांचा मुंबईसाठीचा ‘माईंड गेम’ अचूक ठरला; आता लक्ष उद्याच्या घोषणेकडे…
तसेच या गाण्याला व्होकल कंडक्टर आणि साउंड इंजिनिअर म्हणून सत्यजित केळकर यांनी काम पाहिलं आहे. तर कोरसमध्ये सरोज पलाडिया, नमिता राऊत, सत्यजित केळकर, नागेश भोसेकर यांनी साथ दिली आहे. हे गाणं पुण्यातील सत्याज साउंड लॅब येथे रेकॉर्ड करण्यात आलं आहे. तर मिक्सिंग आणि मास्टरिंग आणि म्युझिक अरेन्जमेंट देखील सत्यजित केळकर यांनी केलं आहे.
म्युझिशियन्समध्ये सत्यजित केळकर यांनी बासरी तर नागेश भोसेकर यांनी तबला आणि पखवाज वाजवला आहे. यामध्ये रंगनाथ रहाडे, संकेत पावसे, रामेश्वर धोंगडे, सविता रहाडे, श्रेयस शित्रे, अमोल पाठक, सार्थक डवरे, गिरीराज जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. गाण्यासाठी कडक मराठी टीम संकेत पावसे, प्रणित मेढे, महेश काळे, जनार्धन जायभाय, प्रमोद सोनवणे, अक्षय वाघमारे, सागर वाळके, अभिषेक राऊत यांनी मेहनत घेतली आहे.