WhatsApp- Telegram वर केंद्राचा मोठा निर्णय, अनेकांना बसणार फटका; जाणून घ्या नवा नियम
SIM Binding Rules : व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसाठी 1 जानेवारी 2027 पासून नवे नियम लागू होणार आहे. फसवणूक आणि बनावट अकाउंटवर आळा
SIM Binding Rules : व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसाठी 1 जानेवारी 2027 पासून नवे नियम लागू होणार आहे. फसवणूक आणि बनावट अकाउंटवर आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग (DoT) व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या ॲप्ससाठी ‘सिम-बाइंडिंग’ (SIM-binding) नियम लागू करणार आहे. म्हणजेच ज्या फोन नंबरवरून व्हॉट्सॲप वापरले जात आहे, त्याचे सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणे अनिवार्य असले. या नियमाचे पालन करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2026 ची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
‘सिम-बाइंडिंग’ म्हणजे काय
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सरकार व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि टेलिग्रामसारख्या (Telegram) मेसेजिंग ॲप्ससाठी ‘सिम-बाइंडिंग’ नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू करणार आहे. या नियमांनुसार, मेसेजिंग ॲपसाठी वापरल्या जाणाऱ्या फोन नंबरशी संबंधित सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणे आवश्यक आहे. हा नियम सर्व अँड्रॉइड (Android) आणि आयफोन (iPhone) युजर्संना लागू होणार आहे. काही अहवालांनुसार, ॲपलने (Apple) सप्टेंबर महिन्यातच आयओएस (iOS) साठी एक सॉफ्टवेअर अपडेट जारी केले आहे, जे आयफोनमध्ये सिम कार्ड आहे की नाही, हे ओळखू शकते.
SIM BINDING is coming to messaging apps in India! 📱🇮🇳
WhatsApp, Telegram & other platforms face new rules requiring accounts to remain linked to an active SIM.
The goal? Curb cyber fraud and fake identities. 🔐
But questions remain about privacy, multi-device access & user convenience.
Security vs convenience — can we get both? 👀
#SIMBinding #CyberSecurity
— Abhi (@abhim3010) October 22, 2026
वेब व्हर्जनमधून दर 6 तासांनी लॉग-आउट होणार?
तर दुसरीकडे 28 नोव्हेंबर 2025 रोजी दूरसंचार विभागाने प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, ज्यामध्ये वेब सत्रांमधून (Web Sessions) दर 6 तासांनी आपोआप लॉग-आउट होण्याचा कडक नियम समाविष्ट होता. मात्र, सरकारने नंतर हा अनिवार्य लॉग-आउट नियम मागे घेतला. त्याऐवजी आता ‘जोखीम-आधारित’ (Risk-Based) सिस्टीम लागू करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, केवळ संशयास्पद किंवा फसवणुकीची कृती आढळल्यासच सेवा बंद केली जाईल किंवा यूजर्संना लॉग-आउट केले जाईल.
शरद पवारांचा मोठा निर्णय; नितेश कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी-
1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या नियमांनुसार, यूजर्संना वेब व्हर्जनमधून दर सहा तासांनी आपोआप लॉग-आउट केले जाणार नाही परंतु, सिम कार्ड फोन असणे आवश्यक असल्याची अट कायम राहील.