SBI मध्ये १०७ जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपूर्वी करू शकता अर्ज, जाणून घ्या काय आहे पात्रता…
State Bank of India Recruitment : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरीच्या संधी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्मरर्स (केवळ माजी सैनिक/माजी CAPF/AR साठी राखीव) आणि लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर (माजी सैनिक/राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्यांरी /माजी CAPF/AR साठी राखीव) या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 107 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी आपले अर्ज करू शकतात.
107 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे, त्यापैकी 89 रिक्त पदे लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर पदासाठी आहेत आणि 18 रिक्त पदे आर्मरर पदासाठी आहेत. आर्मरर्सच्या पदासाठी फक्त माजी सैनिक, माजी सीएपीएफ कॉन्स्टेबल (एआर) अर्ज करू शकतात तर लिपिक कॅडरमधील कंट्रोल रूम ऑपरेटर पदांसाठी फक्त माजी सैनिक, माजी सीएपीएफ कॉन्स्टेबल (एआर), माजी फायर सर्व्हिस कर्मचारी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 6 सप्टेंबरपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर आहे.
वय श्रेणी :
आर्मरर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे किमान वय हे 20 वर्ष आणि कमाल वय 45 वर्ष असावं.
कंट्रोल रूम ऑपरेटरच्या पदासाठी, उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि माजी सैनिक/माजी CAPF/AR साठी कमाल वय 48 वर्षे आहे.
राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्यांसाठी 35 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज शुल्क:
उमेदवारांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही.
अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी SBI च्या अधिकृत साईटला sbi.co.in वर जा.
त्यानंतर होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा
एक नवीन पृष्ठ उघडेल जिथं उमेदवारांना भरतीसाठी लिंक दिसेल.
लॉगिन तपशील किंवा नोंदणी तपशील प्रविष्ट करा.
त्यानंतर अर्ज भरा आणि कागदपत्रे सबमिट करा.
अर्ज भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा
जाहिरात-
https://sbi.co.in/documents/77530/36548767/050920231755-Detailed+AD+Final.pdf/0ff0a69a-2d59-a2d3-76b7-34c95bc95e9b?t=16939