Twitter पोस्टची शब्दमर्यादा पुन्हा वाढवली; आता करता येणार १०,००० अक्षरांचे ट्विट

  • Written By: Published:
Twitter पोस्टची शब्दमर्यादा पुन्हा वाढवली; आता करता येणार १०,००० अक्षरांचे ट्विट

Twitter Update : ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. एकीकडे ट्विटर ब्लूची पेड सर्व्हिस आणल्यानंतर त्यांनी ट्विटर ब्लु च्या युजर्सना काही स्पेशल फिचर दिले आहेत.

ट्विटर ब्लु च्या युझर्सना त्यांनी ब्लु टिक सोबत ज्यादाची वर्ड लिमिट, व्हिडीओ अपलोडींग असे काही फीचर्स त्यांनी दिले आहेत. काही महिन्यापूर्वी ट्विटरची शब्द मर्यादा 4000 पर्यंत वाढवली गेली होती. त्याच्या आधी ट्विटरची शब्द मर्यादा 280 होती.

पॉर्न सर्च करतायं? तर सावध व्हा…कारण

पण आता यामध्ये देखील ट्विटरकडून वाढ करण्यात आली आहे. आज जाहीर केल्यानुसार ट्विटरची शब्द मर्यादा 4000 अक्षराहून वाढवून ती 10,000 अक्षरापर्यंत वाढवली आहे. याशिवाय आजपासून या शब्दांना युझर्स फॉरमॅट देखील करता येणार आहे.

त्यामुळे युजर्स आता या टेक्सला बोल्ड, इटालिक असे फॉरमॅट देखील वापरता येणार आहे. या नव्या फीचर्समूळे फेसबुक प्रमाणे मोठ्या पोस्ट लिहता येणार आहेत.

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube