‘कृषी कर्ज मित्र’ योजना आहे तरी काय? वाचा!

‘कृषी कर्ज मित्र’ योजना आहे तरी काय? वाचा!

LetsUpp | Govt.Schemes
आज आपण महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra)नवीन कृषी कर्ज योजने (Agricultural Loan Scheme)संदर्भात माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना (farmers)वेळेत आणि सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. काय आहे ही योजना, या योजनेचे स्वरूप काय, कृषी कर्ज मित्र (Agricultural Loan Friends)नोंदणी प्रक्रिया, प्रकरण करण्यासाठी सेवा शुल्काचा दर किती असणार? योजनेचा कालावधी किती, निधीचा स्रोत व रक्कम किती? या बाबतची माहिती आपण पाहणार आहोत.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा सिनेमा बघून बायकोने घेतली शाळा; म्हणाली, ‘मला लाज वाटली…’

कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट काय? : शेतकर्‍यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करून देणे आणि या द्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास करणे शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देणे. सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्याची सुटका करणे.

कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप काय?
● दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता, यात विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे.
● निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्त शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, परंतु या कर्जाच्या प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.
● अशा इच्छूक आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज मिळवून देणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार करून दिल्यास, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल.

या योजनेसाठी प्रति प्रकरण सेवाशुल्काचा दर किती?
● अ.अल्प मुदतीचे कर्ज
● प्रथमतः पीक कर्ज घेणारा
● पहिल्यांदाच पीक कर्ज घेणारा शेतकरी असेल
● त्याला प्रति प्रकरण सेवाशुल्क १५०/- रुपये आकारला जाईल.

मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारा
● नवीन कर्ज प्रकरण असेल, तर त्यासाठी शेतकऱ्याला प्रति प्रकरण २५०/- रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल.
● कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण करावयाचे असल्यास शेतकऱ्याला प्रति प्रकरण २००/- रुपये सेवाशुल्क भरावा लागेल.

कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करायची?
● कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषीकर्ज मित्र नोंदणी करायची आहे.
● नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तीची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
● जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार असतील.

कृषी कर्ज मित्राची कामे कोणती?
● कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी लागेल.
● कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करतील.
● कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी या दोघांमधील मध्यस्थांच्या भूमिके ऐवजी सहाय्यक आणि सल्लागार यांची भूमिका बजावेल.
● कृषी कर्ज मित्राला प्रामाणिक पणे व पारदर्शीपणे शेतकऱ्यास सल्ला देणे आणि सहाय्य करणे याविषयीचे बंद पत्र देणे आवश्यक राहील.
कृषी कर्ज मित्र योजनेचा कालावधी किती? : सदर योजनेचा कालावधी हा सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष राहील. आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी वाढवणे किंवा कमी करणे याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील.

कृषी कर्ज मित्र योजना निधीचा स्त्रोत व रक्कम : जिल्हा परिषद स्वनिधी २०२१-२२ च्या अंदाजपत्रकानुसार कृषी खर्चाची मर्यादा उपाये १० लाख पर्यंत निश्चित केली गेली आहे.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube