लग्नानंतर मुलींची फिगर बिघडते? वाचा, ‘ते’ 8 बदल जे मुलींच्या वजनाचा काटा हलवतात…
Why Girls Weight Gain After Marriage लग्न झालं की, मुलींच्या बाबतीत एक गोष्ट हमखास चर्चेत येते, ती म्हणजे लग्नानंतर मुलींचं वजन का वाढतं?
Why Girls Weight Gain After Marriage : लग्न झालं की, अनेक मुलींच्या बाबतीत एक गोष्ट हमखास चर्चेत येते, ती म्हणजे लग्नानंतर मुलींचं वजन का वाढतं? अनेकदा लोक याला सुखी संसाराचं लक्षण मानतात, पण त्यामागे केवळ सुबत्ता नसते. लग्नानंतर महिलांच्या शरीरात आणि आयुष्यात होणारे अनेक छोटे-मोठे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. नेमकी ही कारणं काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
1. नवीन नात्यातील ‘पार्ट्या’ आणि ‘बाहेरचं खाणं’
लग्नाचे सुरुवातीचे दिवस म्हणजे पाहुणचार, पार्ट्या आणि हॉटेलिंगचा सुकाळ असतो. नवीन नात्यात बाहेर फिरणं वाढतं, ज्यामुळे गोडधोड आणि तेलकट पदार्थांचं प्रमाण वाढून शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात.
2. झोपेचं खोबरं आणि बदललेली वेळ
नवीन घरात गेल्यावर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेताना महिलांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पूर्णपणे बदलतात. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं किंवा पुरेशी झोप न मिळणं यामुळे शरीराची मेटाबॉलिझम मंदावते आणि वजन वाढू लागतं.
3. घरच्या जबाबदाऱ्या आणि व्यायामाचा कंटाळा
लग्नाआधी स्वतःच्या फिटनेसकडे आणि जिम किंवा योगाकडे जेवढं लक्ष दिलं जातं, तेवढं लग्नानंतर घरगुती जबाबदाऱ्यांमुळे शक्य होत नाही. व्यायामासाठी वेळ न मिळणं हे वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे.
4. हॉर्मोन्सचे चढ-उतार आणि भावनिक बदल
लग्नानंतरच्या नवीन वातावरणात येणारा ताण किंवा कधीकधी असलेली असुरक्षिततेची भावना यामुळे महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्समध्ये मोठे बदल होतात. या बदलांचा थेट परिणाम वजनावर होतो.
5. उरलेलं अन्न संपवण्याची सवय
आपल्याकडे अनेक घरांमध्ये अन्न वाया जाऊ नये ही मानसिकता असते. त्यामुळे भूक नसतानाही घरातील उरलेलं अन्न महिला संपवतात. ही सवय वजनाचा काटा वेगाने पुढे नेते.
6. निसर्गतः कमी होणारा मेटाबॉलिक रेट
साधारणतः ज्या वयात मुलींचे लग्न होते, त्याच काळात वयानुसार शरीराचा मेटाबॉलिक रेट नैसर्गिकरित्या कमी होत असतो. अशा वेळी चरबी साठण्याचं प्रमाण वाढतं.
7. प्रेग्नेंसी आणि शारीरिक बदल
बऱ्याचदा लग्नानंतर काही काळानंतर गर्भधारणेमुळे महिलांच्या वजनात नैसर्गिकरित्या मोठी वाढ होते. डिलिव्हरीनंतर वाढलेलं हे वजन कमी करणं अनेकदा कठीण होऊन बसतं.
8. ‘हॅप्पी वेट’चं लॉजिक
लग्नानंतर आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आणि मानसिक सुरक्षितता येते. याला वैद्यकीय भाषेत ‘हॅप्पी वेट’ म्हणतात. मन शांत आणि प्रसन्न असल्याने अनेकदा फिटनेसबाबतची शिस्त थोडी सैल होते आणि वजनात भर पडते.