रेस्टॉरंटमध्ये सर्वात आधी पाणीच का सर्व्ह केलं जातं?; 99 % लोकांना माहीत नाही कारण

Why Restaurants Serve Water First रेस्टॉरंटमध्ये बसताच सर्वात आधी पाणीच का दिलं जातं? कारण जाणून तुम्हीही म्हणाल 'अरे, हेच खरं!'

  • Written By: Published:
Water

Why Restaurants Serve Water First : तुम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एका गोष्टीकडे लक्ष दिले आहे का? तुम्ही मेन्यू कार्ड उघडण्यापूर्वी किंवा ऑर्डर देण्यापूर्वीच वेटर तुमच्या टेबलवर पाण्याचा ग्लास आणून ठेवतो. ही केवळ एक साधी सवय नसून त्यामागे अतिशय विचारपूर्वक ठरवलेली व्यावसायिक आणि मानसशास्त्रीय कारणे आहेत.

दिल्ली-मुंबईतील नव्हे तर, छोट्या शहरातील लोकं लग्नानंतर ‘लफडी’ करण्यात पुढे; वाचा सर्व्हे

पाणी सर्व्ह करण्यामागची रंजक कारणे कोणती?

भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचे स्वागत नेहमी पाण्याने केले जाते. रेस्टॉरंटमध्येही हेच संकेत पाळले जातात. अनेक रेस्टॉरंट्सही याच परंपरेचं पालन करतात. त्यामुळे ग्राहक बसल्यानंतर पाणी देऊन त्याचं स्वागत केलं जातं, हा एक सकारात्मक संदेश असतो. अनेक ग्राहक ऑफिस, बाजारपेठ किंवा प्रवास करून थेट रेस्टॉरंटमध्ये येतात. अशावेळी शरीराला सर्वप्रथम पाण्याची गरज असते. पाण्याचा एक ग्लास शरीराला ताजेतवाने करतो आणि ग्राहकाला काही क्षण आराम मिळतो, ज्यामुळे ग्राहक पुढचा वेळ शांतपणे घालवू शकतो.

महागडे फ्लॅट, आलिशान टॉवर्स तरीही भारतीय बाल्कनीतच कपडे का वाळवतात?

ऑर्डर ठरवण्यासाठी मिळतो वेळ

रेस्टॉरंटमध्ये बसताच बहुतांश लोक लगेच ऑर्डर देत नाहीत. आधी मेन्यू पाहणे, सोबत आलेल्यांशी चर्चा करणे आणि मग पदार्थ निवडणे, अशी प्रक्रिया असते. तोपर्यंत पाणी दिल्याने ग्राहकावर घाईचं कोणतंही दडपण येत नाही. त्याचवेळी वेटरलाही इतर टेबलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो. चांगल्या रेस्टॉरंटची ओळख केवळ चविष्ट जेवणाने होत नाही, तर सेवेतल्या छोट्या-छोट्या गोष्टींनीही होते. ग्राहक काही मागण्यापूर्वीच त्याला पाणी देणं ही उत्तम ग्राहकसेवेची खूण मानली जाते. त्यामुळे बहुतांश हॉटेल्समध्ये ग्राहकांना पहिले पाणी दिले जाते. म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर तुमच्या टेबलावर सर्वात आधी पाण्याचा ग्लास ठेवला गेला, तर तो केवळ तहान भागवण्यासाठी नसून, उत्तम आदरातिथ्य, ग्राहकांचा सन्मान आणि दर्जेदार सेवेचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं समजा.

follow us