World Peace Day 2024 : का साजरा केला जातो जागतिक शांतता दिन? जाणून घ्या, इतिहास अन् महत्व..
World Peace Day 2024 : जगभरातील हिंसा आणि संघर्ष टाळून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला (World Peace Day) जातो. संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी 21 सप्टेंबर (United Nations) रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात विविध उपक्रम आयोजित केले जातात. आज जागतिक शांतता दिवस सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. पहिला आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर 1981 रोजी साजरा करण्यात आला होता.
जगभरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा मानला गेला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी हा दिवस साजरा करण्यात येत होता. नंतर यामध्ये बदल करण्यात येऊन 21 सप्टेंबर हाच दिवस यासाठी निश्चित करण्यात आले. व्यक्ती, समाज आणि देशांना अधिक शांतीपूर्ण न्यायपूर्ण जगाच्या दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे खास महत्त्व आहे. या वर्षातील शांतता दिवसाची थीम Cultivating a Culture of Peace अशी आहे.
Horoscope Today: आजचे राशी भविष्य, मिथुन राशीच्या लोकांनी महत्त्वाची माहिती गुप्त ठेवावी
शांतता दिन कधी सुरू झाला ?
जागतिक शांतता दिनाची सुरुवात सन 1981 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती. दोन दशकांनंतर 2001 मध्ये महासभेने सर्वानुमते या दिवसाला अहिंसा आणि युद्धविराम कालावधीच्या रुपात नामित करण्यासाठी मतदान केले होते. हिंसेच्या विरोधात आवाज उठवणे आणि या समस्यांवर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी जागतिक शांतता दिन प्रोत्साहन देतो. लोकांमध्ये शांततेबाबत जागरुकता आणणे आणि शांतिपूर्ण समाज तयार करण्याच्या कामात आजच्या दिवसाचे योगदान आहे.
जागतिक शांतता दिनाची थीम
सन 2024 मधील आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम खास आहे. Cultivating a Culture of Peace अशी ही थीम आहे. या वर्षात जगभरात ठिकठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांची माहिती देते.
तुम्ही काय करू शकता..
शांततेच्या विविध उपक्रमात सहभागी व्हा. लोकांना शांततेचे महत्व पटवून द्या. हिंसा होत असेल त्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवा आणि शांततेच्या मार्गांचा पुरस्कार करा. आपले मित्र, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांशी शांततेच्या संदर्भात चर्चा करा. शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदतही करू शकता.
जागतिक लोकशाही दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या, इंटरेस्टिंग फॅक्टस..