तंत्रज्ञानापासून-विपणनापर्यंतची चर्चासत्रे उपयुक्त ठरतील, अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला विश्वास

तंत्रज्ञानापासून-विपणनापर्यंतची चर्चासत्रे उपयुक्त ठरतील, अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला विश्वास

औरंगाबाद : कृषी महोत्सवात कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांची लागवड आणि तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

औरंगाबादेतील सिल्लोड इथे आज राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी स्टॉलला भेट देऊन आयोजित सभा यावेळी रद्द केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री, डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे आदी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2023 पर्यंत राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव – 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात एकूण 600 दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहेत.

यावेळी नाशिक जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द केली आहे. राज्यभरातील जवळपास 10 लाख शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा अंदाज आहे. आगामी वर्ष हे आंतरराष्ट्रीयस्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्यांचं म्हणून साजरे होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भूमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे.

दरम्यान, महोत्सवात कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube