नेते मलाच का टार्गेट करतात? अब्दुल सत्तारांचा सवाल

नेते मलाच का टार्गेट करतात? अब्दुल सत्तारांचा सवाल

औरंगाबाद : सर्वच नेते मलाच का टार्गेट करतात, असा सवाल राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना केला आहे. औरंगाबादेतील सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, मी आज सत्तेत आहे, मी कोणावर टीका-टीपणी करत नाही. सत्तेत असताना कोणावर टीका टीपणी करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच मी एक छोटा साधा आणि सिंपल कार्यकर्ता असून माझ्या आवती-भोवती अधिवेशन झालं. सर्वच लोकं मलाच का टारगेट करतात. मी एक छोटा कलाकार आहे.

माझ्यापेक्षा मोठ्या कलाकारांकडे मोठे नेत्यांकडे पाहिलं पाहिजे. कोणीही टीका-टीपणी केली तर मी कोणालाही उत्तर न देता छोटी मोठी टीका करत असल्याचं त्यांनी म्हंटलयं. राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टॉलला भेट देऊन लगेच बाहेर येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी अब्दुल सत्तारांना लक्ष्य केलं आणि त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली. त्यामुळे अधिवेशन चांगलंच गाजलं आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर अब्दुल सत्तारांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube