गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क; केंद्राच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे.
कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं.
दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, खोकला आणि सर्दी झाल्यास टेस्ट करून घ्यावी. प्रिकॉशन डोस आतापर्यंत फक्त 27 टक्के लोकांनी घेतला आहे, ज्यांनी डोस घेतला नाही, त्यांनी डोस घ्यावा. सध्या कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत.
आरोग्य मंत्रालयानं केल्या महत्त्वाच्या सूचना
गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा
ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
अधिका-यांना सतर्कतेचे आदेश
न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा