धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार 25 लाखांचा अन् पुरस्कार सोहळ्यावर झालेला खर्च 14 कोटी रुपये

धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार 25 लाखांचा अन् पुरस्कार सोहळ्यावर झालेला खर्च 14 कोटी रुपये

14 crores spent on Maharashtra Bhushan Award ceremony : काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. दरम्यान, आता या कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाची रक्कम समोर आली आहे. राज्य सरकारने या पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 14 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड झालं आहे.

नवी मुंबईच्या खारघर येथील सेंट्रल पार्क परिसरात राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील दिल्लीहून आले होते. शाह यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित शाह येणार असल्यामुळं साहजिकच हा कार्यक्रम भरगच्च होणार होता. या पुरस्कार सोहळ्याला धर्माधिकारी यांच्या लाखो भाविकांनीही हजेरी लावली होती. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात उष्माघाताने अनेकांचे बळी घेतले, तर शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटूंबियांना तातडीनं मदत जाहीर केली. मात्र, सरकारने जाहिर केलेली ही रक्कम तोकडी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दरम्यान अजित पवार यांनी या सरकारी कार्यक्रमासाठी 14 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं. सरकारने पाण्यासारखा पैसा केल्यावर तरी हा प्रकार घडायला नको होता, असं ते म्हणाले.

भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नाही : उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्याला सांगितले

दरम्यान, आता या पुरस्कार सोहळ्यासाठी नेमका किती खर्च झाला, याचा आकडा समोर आला आहे. माहीती आणि जनसंपर्क संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भुषण पुरस्काराची रक्कम ही 25 लाख रुपये होती. तर या पुरस्कार सोहळ्याच्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी सरकारने 13 कोटी 62 लाख 51 हजार रुपये खर्च केल्याचं सांगितलं.

राज्य सरकारने मृतांच्या कुटूंबियांना तातडीनं मदत जाहीर केली. मात्र, सरकारने जाहिर केलेली ही रक्कम तोकडी असल्याची टीका विरोधकांनी केल्यानंतर आता पुरस्कार सोहळ्यासाठी झालेला अवाढव्य खर्चाचा आकडा समोर आला आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube