Nirankari Mission : निरंकारी मिशन मार्फत कळवा येथे आयोजित शिबिरात 259 युनिट रक्तदान
Nirankari Mission : “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नको.’ बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या या दिव्य उद्घोषाला जीवनाचे अंग बनवत
Nirankari Mission : “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नको.’ बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या या दिव्य उद्घोषाला जीवनाचे अंग बनवत संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या (Sant Nirankari Charitable Foundation) वतीने कळवा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 259 युनिट रक्तदान करण्यात आले.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदानासाठी सुमारे 370 निरंकारी भक्तांनी आपली नांवे नोंदवली होती त्यापैकी 259 रक्तदात्यांना रक्तदानाद्वारे मानवतेच्या सेवेमध्ये आपले योगदान देण्याची संधी मिळाली. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढी व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) कळवा (Kalwa) यांनी रक्त संकलन केले.
या शिबिराचा शुभारंभ संत निरंकारी मंडळाचे ज्ञान प्रचारक बाबुभाई पंचाल यांच्या उपस्थितिमध्ये निरंकार प्रभुच्या प्रति प्रार्थनेने करण्यात आला. या प्रसंगी मिशनच्या विविध शाखांचे प्रबंधक तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.
भारतीय संघात एन्ट्री करणार वैभव सूर्यवंशी; ‘या’ खेळाडूची घेणार जागा
ठाण्याचे उप महापौर कृष्णा पाटील, नगरसेवक मिलिंद पाटील, महेश साळवी, अपर्णा साळवी, मंदार केणी, विजया लासे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, सुशांत सूर्यराव यांचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी निष्काम सामाजिक सेवांचे कौतुक केले. कळवा ब्रांचचे मुखी कांतीराम सेमवाल यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहकार्याने या शिबिराचे अत्यंत सुंदर प्रकारे आयोजन केले.
भूषण प्रधानची ‘स्वप्नसुंदरी’ 24 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला