पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं महत्व कमी झाल्याची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे मात्र अजूनही शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज्यभरातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशाचत आता ठाकरे गटाला (Thackeray group) आणखी एक धक्का बसला आहे. पंढरपुरात ठाकरे गटातील सुमारे 300 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. तब्बल तीनशे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिदेंना साथ दिली. त्यात उपजिल्हाप्रमुख, सरपंचासह माजी जिल्हा परिषद सदस्य व ठाकरे गटातील अन्य सदस्यांचा समावेश आहे. शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत या विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

BJP कडून पंतप्रधान मोदींचा ‘टर्मिनेटर’ असा उल्लेख, पोस्टर शेअर करून इंडिया आघाडीवर टीका 

या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतील वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पंढरपुरात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याचं बोलल्या जात आहे. या पक्षप्रवेशामुळं मोहोळ-पंढरपूर मतदारसंघात आता शिंदे गटाला चांगलाच बळ मिळाले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, पक्षप्रतोद आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगवले यांच्या मार्गदर्शनाखाली राजू खरे यांनी मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेची ताकद वाढवली आहे. याठिकाणच्या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत आणण्यात त्यांना यश आले आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते राजू खरे यांच्या पाठीवर थाप टाकत समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोहोळ-पंढरपूर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येते. या भागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube