अजितदादांच्या गटातील आमदारांना 48 तासांचा अल्टिमेटम, पवारांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

  • Written By: Published:
अजितदादांच्या गटातील आमदारांना 48 तासांचा अल्टिमेटम, पवारांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांसोबत कारवाईचा धडाका सुरु केला आहे. (48 hours ultimatum to MLAs of Ajit Pawar group, show cause notice issued by Pawar)

आगोदर त्या शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता शरद पवार गटाचे व्हिप जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या 12 आमदारांना नोटीस पाठवलेली आहे. 5 जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या आमदारांना उत्तर देण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

5 जुलै रोजी यशवंराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवार यांनी ते 9 मंत्री वगळता सर्व आमदारांना निमंत्रण पाठवले होते. परंतु या बैठकीला शरद पवार यांच्या गटातील फक्त 18 आमदार उपस्थित होते. तसेच याचं दिवशी अजित पवार यांनी देखील आपल्या गटाची बैठक बोलवली होती. शरद पवार गटाचे बाकीचे आमदार अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. पक्ष विरोधी कारवाई कारवाई केल्या प्रकरणी अजित पवार गटाच्या 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली तसेच या नोटिसीला उत्तर देण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

कृषी खातं काढून घेतलं तरीही अब्दुल सत्तार म्हणतात, मी खुश…

‘या’ आमदारांना नोटीस

सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे; या आमदारांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube