यंदा दणक्यात साजरी होणार आषाढी वारी; एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

यंदा दणक्यात साजरी होणार आषाढी वारी; एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

विठुरायाच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढपूरात 5 हजार विशेष बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तसेच पंढरपुरात स्थानकासाठी 4 तात्पुरत्या स्वरुपाची बसस्थानके उभारली जाणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या जिल्ह्यांमधून गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. वारकरी आणि पर्यटकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी हा पंढरपुरातील चार ठिकाणी बसस्थानके उभारण्यात येणार आहेत.

ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच टक्के मागतायत : आव्हाड लवकरच नाव जाहीर करणार

आषाढी एकादशीनिमित्त विठूनामाचा जयघोष करीत पंढरपूरला रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झालं आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक आणि प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube