Chitra Wagh : तिकिटात ५० टक्के सवलत, चित्रा वाघ एसटीमधून प्रवास करत म्हणतात..

  • Written By: Published:
Chitra Wagh : तिकिटात ५० टक्के सवलत, चित्रा वाघ एसटीमधून प्रवास करत म्हणतात..

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या 2023-24 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार आता महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासामध्ये तब्बल 50 टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेचं नाव महिला सन्मान योजना असं आहे.

कालपासून राज्यभरात एसटी मध्ये ५०% सवलत सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एसटीने प्रवास केला आहे. नाशिक येथील ठक्कर येथून ते मालेगाव (Nashik To Malegaon) असा बस प्रवास त्यांनी केला आहे. चित्र वाघ यांनी स्वतः एसटी मधून प्रवास केल्याचे शेअर करत सोबत एक पोस्ट लिहली आहे.

पोस्ट मध्ये नक्की काय लिहलं आहे ?

चित्र वाघ यांनी प्रवासाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. पोस्ट मध्ये त्यांनी लिहलं आहे की, “लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…” याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहले आहे की फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.”

ST Bus : आजपासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार

श्रींच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र लालपरी च्या प्रवासात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री श्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.

आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला.. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या ‘लालपरी सशक्त नारी’ योजनेसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार.

अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे खेडवर चालून आले; रामदास कदम यांचा हल्लाबोल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube