महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर हा पुरस्कार सोहळा पार पडला. कडक उन्हात झालेल्या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सकाळी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

अतिकच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने यूपी पोलिसांना दिली होती

ते पुढं म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे.जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आपपास लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली होती. त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले होते. 13 रुग्णांना विशेष उपचारांची गरज होती. यासाठी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. भर उन्हात लोक कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube