नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचा धनराज विसपुतेंना पाठिंबा?

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचा धनराज विसपुतेंना पाठिंबा?

नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघात दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आज नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केलेले धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

अपक्ष उमदेवार धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजपकडून आपल्याला पाठिंबा मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमदेवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला नाही.

मात्र, भाजपकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आणखी एक अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी पाठिंब्यासाठी विनंती केल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून जाहीरणे पाठिंबा मिळत असल्याने निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नाशिक मतदारसंघात एकूण दहा अपक्षांच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेयं. त्यापैकी सत्यजित तांबे हे आपण कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा करीत आहेत. तर कॉंग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात येत आहे.

कॉंग्रेसकडून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेत मुलगा सत्यजित तांबेचा अपक्ष अर्ज भरला.

दरम्यान, ज्यावेळी सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आणि दुसरीकडे सत्यजित तांबेंनी पाठिंबा मागितल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देणार असल्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं. तेव्हा निवडणुकीत तांबे बाजी मारणार हे नक्की झालं होतं. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमेदवाराला अधिकृतपणे पाठिंबा देण्यात आला नाही.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आल्याने आता या निवडणुकीत पाटील यांनी तांबे यांना ललकारल्याची परिस्थिती दिसून येत आहे. आता पुढे आणखी नवीन कोणता ट्विस्ट येणार? निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांना लागलीय.
आता

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube